पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजे मुख्यमंत्र्यांसोबत विशेष विमानाने दिल्लीत, खासदारकीचा राजीनामा

उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानाने दिल्लीला गेले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले थोड्याच वेळात नवी दिल्लीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष विमानाने उदयनराजे शुक्रवारी रात्री नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. राज्यातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. 

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा होती. अखेर शुक्रवारी खुद्द राजेंनी ट्विट करून आपल्या प्रवेशाबद्दल माहिती दिली. उदयनराजे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सादर केला. यावेळी ओम बिर्ला यांना खास पगडीही त्यांनी भेट म्हणून दिली. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावेळी उदयनराजे यांच्यासोबत उपस्थित होते. 

शनिवारी सकाळी नऊ वाजता भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उदयनराजे औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

आता मोबाईल चोरीला गेल्यास काळजी करू नका, सरकारचा नवा उपक्रम मदतीला

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला आणखी बळ मिळाले आहे. मराठा समाजातील मोठे नेतृत्त्व भाजपमध्ये येत असल्यामुळे त्याचा निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.