पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय म्हंटलय?

उदयनराजे भोसले

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजप प्रवेशाची माहिती आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना दिली आहे. शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येऊ लागले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे भाजपप्रवेशाबद्दल भूमिका मांडली आहे. 

मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, ...या मुद्द्यावर झाली चर्चा

ट्विटमध्ये उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील. या ट्विटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि अमित शहा यांनाही मेन्शन केले आहे. त्यांच्या या ट्विटला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६०० हून अधिक लोकांनी लाईक केले होते.

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत केला प्रवेश

उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शुक्रवारीच पक्षाचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.