पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेते सत्यजित देशमुखांनी भाजपमध्ये केला प्रवेश

सत्यजित देशमुख

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. शिराळ्याचे काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. महाजनादेश यात्रे दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सत्यजित देशमुख यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. 

ह्युस्टनमध्ये मोदींसाठी आयोजित कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प येणार

शिराळयाचे काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. शिराळयात पार पडलेल्या जनसंवाद मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवासांपासून सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. सत्यजित देशमुख हे शिराळयाचे काँग्रेस नेते व माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. 

जैश-ए-मोहम्मदने दिली रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी

जनसंवाद मेळाव्या दरम्यान सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. 'स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाची शकलं उडायला लागली आहेत. शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केला', असल्याची टीका करत सत्यजित देशमुख यांनी केली आहे. 

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे