पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यभर सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिकमध्ये समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. याठिकाणी पंतप्रधानांची जाहीर सभा देखील होणार आहे. पंचवटीतील तपोवनात मोदींची ही जाहीर सभा होणार असून सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे 

मुंबई, ठाणे, कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुट्टी जाहीर

मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभास्थळी अडीच हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसंच मोदींच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. सभेसाठी येणाऱ्यांसाठी तपोवन परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्यांनी वाहनतळांचा वापर करावा असे आवाहन, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले -श्रींगी यांनी केले आहे. 

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

नाशिकमधील मोदींच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, भाजपचे मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी महाराष्ट्रातील जनता आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तसंच, २०१४ नंतर पुन्हा नाशिकमधून भाजप निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.  

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोस्टरबाजी