पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोठ्या भावाप्रमाणे बाळासाहेबांनी एकत्रित लढण्याबाबत निर्णय घ्यावा'

इम्तियाज जलील आणि अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये पुन्हा मनोमिलन होण्याचे संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही पक्षांनी एकत्रित मैदानात उतरणे फायदेशीर ठरेल, असेही ते म्हणाले. 

एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत: प्रकाश आंबेडकर

जागा वाटपाच्या मुद्यावरुन आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. बाळासाहेबांनी मोठ्या भावाच्या भूमिकेतून एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा करावी. त्यांचा आदेश एमआयएम पक्षाला मान्य असेल, असेही ते म्हणाले. मध्यस्थीसंबंधात सध्या बाळासाहेब माझ्यासोबत संवाद साधण्यास तयार नाहीत. त्यांनी ही भूमिका का घेतली? हे माहित नाही. पण मी आजही त्यांचा आदर करतो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागायला देखील तयार आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.  

वंचित आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब, एमआयएमचा 'एकला चलो रे'

यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएमने एकत्रित लढण्यास नकार दिल्याचे म्हटले होते. एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. चावी त्यांच्याकडेच आहे, असा उल्लेखही त्यांनी केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prakash ambedkar talk to asaduddin owaisi on bahujan vanchit aghadi and mim alliance says mtiaz Jaleel