पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत केला प्रवेश

भास्कर जाधव शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, भास्कर जाधव यांचे शिवसेनेत स्वागत करत लढवय्या शिवसैनिक परत घरात आला असल्याची प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी दिली. तसंच, भास्कर जाधव यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसैनिकांना खूप आनंद झाला असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. 

दिल्लीमध्ये ४ नोव्हेंबरपासून लागू होणार सम-विषम योजना: केजरीवाल

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी सुध्दा मी माझ्या पूर्वीच्या घरी परत आलो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'माझे कोणाशी भांडण नाही. माझा कुणावर आक्षेप नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्मा मूळचा शिवसैनिकाचा आहे. मूळचा स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. तसंच उध्दव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाची भावना आहे असे देखील भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले. 

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीच्या भावाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कोकणात सुध्दा राष्ट्रवादीला धक्का बसला असून भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज सकाळी भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. औरंगाबाद येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सपूर्द केला. विधानसभा अध्यक्षांनी त्याचा राजीनामा मंजूर केला. 

सुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक