पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लक्षात ठेवा! जाहिराती पाहून तेल आणि साबण निवडतात सरकार नव्हे'

अमोल कोल्हे

राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून करत असलेल्या जाहिरातीचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. नवी मुंबई येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सरकारने कोणतीही कामे केलेली नाहीत. मात्र जाहिरातीच्या माध्यमातून ते न केलेली कामे जनतेच्या माथी थोपवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

'लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत, पण त्यांचा आमच्यावर विश्वास : देवेंद्र फडणवीस

अमोल कोल्हे म्हणाले की, एका जाहिरातीसाठी साधारणता १२ हजार रुपये इतका खर्च येतो. सरकार तासाला १० जाहिराती तुमच्या माथी मारत आहे. याची आकडेमोड केली तर न केलेली कामे केल्याचे सांगण्यासाठी महाराष्ट्र शासन एका तासाला साडेपाच लाख रुपये खर्च करत आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

दिवसाचे चोवीस तास असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, न केलेली कामे पुन्हा पुन्हा तुमच्या माथी मारण्यासाठी राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत आहे. २०१४ चा अनुभव लक्षात ठेवा. आपले वाड-वडील चांगले सांगायचे. जाहिराती बघून तेल आणि साबण निवडायचा असतो सरकार नाही, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली.