पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

सोनिया गांधी आणि शरद पवार (संग्रहित फोटो)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या '१० जनपथ' निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप समजलेले नाही. पण पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांपुढे भाजप आणि शिवसेना यांचे मोठे आव्हान आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील विविध नेते गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. अनेक जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते भाजप आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष बँकफूटवर गेले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर यश मिळाले होते. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आघाडीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. 

'अलिबाबा'तून जॅक मा पायउतार, वाचा त्यांच्या भन्नाट कारकीर्दीविषयी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NCP Chief Sharad Pawar meet Congress interim president Sonia Gandhi at her residence in delhi