देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीपूर्वीच होतील, असे संकेत दिले आहेत.
ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट, 'या' मुद्द्यांवर केली चर्चा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठका घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्र असावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे. तसेच काही राजकीय पक्षांनी दिवाळीपूर्वीच निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली आहे, अशी माहिती आयुक्त सुनील आरोरा यांनी दिली. या संदर्भात निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
यावेळी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी देखील राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे. बॅलेट पेपर आता इतिहास जमा झाले आहेत. ईव्हीएमसोबत VVPAT असल्याने निवडणुकांमध्ये पारदर्शकता असेल, असे आश्वासन निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.