पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयोगाची उद्या मुंबईत बैठक, लवकरच निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार

निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषीत होणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुनील चंद्रा मंगळवारी मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी निवडणूक आयुक्त कमिटी आपला दौरा आटोपून पुन्हा दिल्लीला परतणार आहे. त्यामुळे १९ तारखेला निवडणुकांच्या तारखा घोषीत होण्याचे संकेत आहेत. 

'नाणारचं' जे झालं तेच 'आरेचं' होईल, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणुका पार पडणार आहेत. यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्यात निवडणुका पार पडल्या होत्या. मागील निवडणुकीत भाजपला २८८ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेसोबत युतीच्या माध्यमातून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते.

काँग्रेस नेते सत्यजित देशमुखांनी भाजपमध्ये केला प्रवेश

आयुक्तांच्या महाराष्ट्रातील पाहणी दौऱ्यानंतर लवकरच निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. २०१४ मध्ये १५ ऑक्टोंबरला मतदान झाले होते. तर १९ तारखेला निकाल लागला होता. २०१४ मध्ये झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झाले होते.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra assembly elections 2019 Election Commission to visit Mumbai tomorrow to review states preparedness