पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात फेरविचार करेल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकणातील महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचे भाष्य केले. राजापूरमधील सभेला संबोधन करताना फडणवीस म्हणाले की, नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. विरोधामुळे सरकारने प्रकल्प रद्द केला. मात्र तुमचा उत्साह पाहून यासंदर्भात पुन्हा चर्चा करावी लागेल. त्यामुळे या प्रकल्प पुन्हा आणण्याबाबत सरकार फेरविचार करेल. यासंदर्भात तुमच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  

'जागतिक मंचावर भारताच्या आवाजाला आता पूर्वीपेक्षा जास्त

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. 

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास, भाजपत प्रवेश करणारः राणे

शिवसेनेसोबतच्या युतीसाठी तडजोड म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील या प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेतला होता. मात्र आता कोकण दौऱ्यात त्यांनी या प्रकल्पावर भाष्य केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजप-सेना युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले असले तरी जागावाटपाच्या मुद्यावरुन अद्याप दोन्ही पक्षांचे मनोमिलन झालेले नाही. त्यात आता नाणार प्रकल्पाची भर पडून युतीच्या चर्चेवर परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019cm devendra fadnavis statment on nanar refinery project in Maha JanadeshYatra at Rajapur Ratnagiri