पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

आदित्य ठाकरे आणि सुजात आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उभारणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनीही अनेकवेळा निवडणुकीत उभारण्याबाबत संदिग्ध उत्तरे दिली आहेत. आदित्य ठाकरे हे सीबीडी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभारणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याच दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात याच मतदारसंघातून शड्डू ठोकण्याचे ठरवले असल्याचे समजते. 

शिवसेनेच्या वरच्या फळीतील नेते सध्याच्या राजकीय हालचाली नाकारतही नाहीत आणि त्याला दुजोराही देताना दिसत नाहीत. आदित्य ठाकरेही पत्रकारांच्या या प्रश्नावर स्पष्टपणे बोलत नाहीत. पण आदित्य यांच्या जवळील सूत्रांनी मात्र यास दुजोरा दिला आहे. 

पुण्यातील भाजपच्या पारंपारिक मतदार संघात सेनेचा उमेदवार मैदानात

आदित्य यांना आता या मतदारसंघातून कडवी झुंज देण्यासाठी सुजात आंबेडकर नियोजन करत आहे. त्यामुळे युवा मतदारांची मते मिळवण्याच्या आदित्य यांच्या स्वप्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सुजात आंबेडकर यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर थेट भाष्य करण्यास नकार दिला. याबाबतच्या सर्व गोष्टी लवकरच स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजात हे सीबीडी बेलापूरमधूनच निवडणुकीस उभे राहणार आहेत. हे दोन्ही युवा नेते या मतदारसंघात परस्परविरोधात उभारल्यास तुल्यबळ लढत होणार हे निश्चित आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून उभे होते. त्यावेळी सुजात यांनी प्रचारात महत्वाची भूमिका निभावली होती.