पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (शिवसेना टि्वटर)

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये होणाऱ्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले. कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानिमित्त बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगितले.

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत केला प्रवेश

उद्धव ठाकरे म्हणाले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी मी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवा फॉर्म्युला वापरण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेला द्यायच्या जागांची यादी तयार करावी आणि माझ्याकडे द्यावी. ती यादी नंतर मी आमच्या पक्षाच्या नेत्यांपुढे ठेवेन आणि त्यावर आम्ही चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. उपहासात्मकपणे त्यांनी असे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये गेल्या आठवड्यापासून युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. पण जागा वाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि इतर मित्र पक्षांसाठी किती जागा सोडायच्या यावरूनही नेत्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे युतीचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे.

मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, ...या मुद्द्यावर झाली चर्चा

गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्दयावरून ऐनवेळी भाजपने शिवसेनेशी असलेली युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती झाल्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 shivsena chief uddhav thackeray statement on yuti with bjp