पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही. या चर्चे दरम्यान शिवसेनेला कमी जागा दिली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समाधानकारक जागावाटप झालं नाही तर गाफिल राहू नका अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. तसंच, युती होईल अशी आशा आहे. मात्र जर युती तुटली तर २८८ जागा लढवण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा अशा सूचना उध्दव ठाकरे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

जैश-ए-मोहम्मदने दिली रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी

रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसंच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख देखील उपस्थित होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी सर्वांचे मत जाणून घेतले. त्यानंतर या बैठकीमध्ये जर युती झाली नाही तर सर्वांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले. 

'छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात'