राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात ५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. परळी मतदार संघातून धनंजय मुंडे, केज मतदार संघातून नमिता मुंदडा, माजलगाव मतदार संघातून प्रकाश सोळुंके, गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडीत आणि बीड मतदार संघातून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण केले'
बीड शहर सोडता इतर सर्व मतदारसंघातील सर्व उमेदवारांना राष्ट्रवादीने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे परळी मतदार संघामध्ये पुन्हा बहिण-भावांमध्ये लढत होणार आहे. तर बीड मतदार संघामध्ये काका-पुतण्यांमध्ये लढत होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या मतदार संघामध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.