पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही शुक्रवारी ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसनेही विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या २० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ५० उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल असे माध्यमांना सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रत्येकी १२५ चा फॉर्म्युला निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारीच बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पाच उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, केजमधून नमिता मुंदडा, माजलगावमधून प्रकाश सोळुंके, गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत आणि बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

लाचारी स्वीकारणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवारांचे वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे माध्यमांशी बोलत होते. जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच बैठक झाली. दोन्ही पक्षांचा जागा वाटपाबाबतचा निर्णय झाला आहे. दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर मित्र पक्षांना ३८ जागा देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 first list of 50 Congress candidates will be out by September 20 says Balasaheb Thorat