पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : त्यांनी गुलाल उधळावा म्हणून आम्ही नकरुटाला शाई लावून घ्यायची!

विधानसभा मतदानाची प्रतिक्षा (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा भगवा फडकविण्यासाठी भाजप सज्ज झालाय. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांनी चांगला प्रतिसाद ही मिळवलाय. मात्र युतीचं गाणं 'कभी हा कभी ना' असेच सुरु आहे. त्यात काही आश्चर्य वाटजोगेही नाही. पण सगळ्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली ती म्हणजे भाजपची मेगाभरती! बेरोजगार तरुणांनी या भरतीकडे जागरुकतेने पाहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक उलथापालथ नक्कीच पाहायला मिळू शकते. पण तरुणांचं काळीज जागरूक आहे का हे अनुभवण्यासाठी निकालापर्यंत आपल्याला प्रतिक्षा करावी लागेल.

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही मरगळ नाही' 

केंद्रात सत्ता आल्यापासून काँग्रेसला संपवण्याची भाषा भाजपकडून अनेकदा बोलून दाखवण्यात आली. यात मोदीजी अव्वलस्थानी राहिले. या रणनितीमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपने राहुल गांधींना टार्गेट केलं. त्यात भाजप सध्याच्या घडीला आघाडीवरच आहे, असे म्हणता येईल. आपण जेव्हा राज्याकडे येतो तेव्हा भाजपने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे वळविल्याचे पाहायला मिळते.

शरद पवारच का? हे वेगळ सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच मेगा भरतीच्या लॉटमध्ये अधिकाधिक पसंती ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली. यात काही काँग्रेसच्या नेत्यांनाही भाजपने उचलले. ईडी आणि सीबीआयने उचलण्यापेक्षा या मंडळींनी भाजपच्या वळचणीला जाणे पसंत केले, असा युक्तीवादही ऐकायला मिळतो. राज्यातील निष्ठावंत नेत्यांची निष्ठा गळून पडली, असेही काही जणांचे मत आहे. ते काही असो पण सत्तेसाठीच ही सर्व खटोटोप आहे, हे मात्र नाकारता येणार नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे? असा प्रश्न सध्याच्या पक्षांतराच्या राजकारणामुळे निर्माण झाला आहे. 

राम मंदिरासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा - नरेंद्र मोदी

‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशा मोठ्या तोऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला प्रश्न विचारणारा भाजप आज त्यांच्या दावणीला असलेल्या वासरांना घेऊन निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरत आहे. तत्व आणि सत्व गहाण ठेवून राजकारण सुरु आहे, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. पण समाजातच तात्विकता आणि सात्विकता नसेल तर हा प्रश्न विरोधकांसारखा हतबलच ठरतो. एक दिवसांचा राजा असणाऱ्या मतदाराला हे सर्व जाणवतंय पण तो बदलाची अपेक्षाही बाळगतो. पण खरं हे आहे की, आपल्याकडे राजकारण चालते ते बदल्याचे भावनेने आणि त्याचा म्होरक्या असतो उलट्या काळजाचा राजकारणी.

एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत: प्रकाश आंबेडकर

आपण लय ताण घ्यायचा नाही. त्यांनी गुलाल उधळून धडाक्यात उत्सव साजरा करावा यासाठी फक्त नकरुटाला शाई लावून घ्यायची. काय कल्याण करावस वाटलंच ? तर ते करतील. तूर्तास त्यांची आश्वासने ऐकुयात, कधी मधी हेवेदाव्यांची मजा घेऊयात आणि त्या निवडणुकीच्या महासोहळ्याची प्रतिक्षा करु.

-सुशांत जाधव

E-Mail ID : Sushantjournalist23@gmail.com
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 BJP Shivsena NCP Congress and other political parties and voters excitement for election special blogs