पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीला किती जागा मिळतील याचा अमित शहांनी व्यक्त केला नवा अंदाज

अमित शहा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला तीन चतुर्थांश बहुमत मिळेल, असा अंदाज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी नवी दिल्लीत भाजपत प्रवेश केला. अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. या कार्यक्रमावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.

भारतीय हवाई दलाला हवेत अतिरिक्त ४० हजार कोटी

अमित शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमच्या पक्षामध्ये येत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. उदयनराजेंचा आमच्या पक्षाला निश्चितपणे उपयोग होईल. काही दिवसांपूर्वीच मी महाराष्ट्रात गेलो होतो. राज्यातील लोक सरकारच्या कामावर समाधानी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक कामे राज्यात केली आहेत. पुन्हा एकदा युतीलाच निवडून आणण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युतीला तीन चतुर्थांश बहुमत मिळेल आणि आम्हीच परत सत्तेत येऊ, असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांचे विचार भाजपच पुढे नेत आहे, उदयनराजेंचा भाजपत प्रवेश

उदयनराजे आल्यामुळे भाजपला मोठी ताकद मिळाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राजे भाजपत आल्याचा पक्षाबरोबरच समाजालाही फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp president amit shah predicts once again victory in election