पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजेंवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या पवारांना काय मिळाले? - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर खरमरीत टीका केली.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता

'साहेब उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केले. साताऱ्यातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलेत. खरंतर तुमचा स्वभाव तसा नाही. मात्र हे सर्व करून तुम्हाला काय मिळाले?' असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शरद पवार यांच्या शब्दाचा मान न ठेवता उदयनराजेंनी भाजपत प्रवेश केला याबद्दल आव्हाड यांनी सोशल मीडियावर जाहीर नाराजी दर्शवली आहे.

दरम्यान, भाजपात प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी पुण्यात शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. शरद पवारांकडून उदयनराजे यांची मनधरणी करण्यात आली , असंही म्हटलं जात होतं. अखेर उदयनराजेंचा भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थितीत भाजपत प्रवेश झाला.

भास्कर जाधव यांच्या शिवसेनाप्रवेशापूर्वी घडला हा भन्नाट किस्सा!

उदयनराजे यांचे राष्ट्रवादींच्या नेत्यांशी अनेकदा पटले नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद सोडला असता अनेकदा राष्ट्रवादींच्या आमदारांशी त्यांचे खटके उडाले होते. अखेर शनिवारी उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली मेगाभरती पाहून आव्हाडांनी दोघांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते या दोन्ही पक्षात प्रवेश करत आहेत, या दोन्ही पक्षात सुरू असलेला राष्ट्रवादींच्या नेत्यांचा प्रवेश पाहता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला की काय?असा उपरोधिक टोलाही त्यांनी ट्विटरवर लगावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jitendra Awhad slam NCP Lok Sabha MP Udayanraje Bhosale for joing Bharatiya Janata Party