पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव', एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत

प्रदीप शर्मा शिवसेनेत

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या प्रदीप शर्मांची आता राजकारणात नविन इनिंग सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून, भगवा ध्वज स्वीकारून प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

चिदंबरम यांना पुन्हा धक्का, दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळली

'बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव होता, त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. उद्धव  ठाकरे हे मला भावासारखे आहेत', असं मनोगत यावेळी प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केलं. 'अजूनही काही लोक शिवसेनेत येणे बाकी आहेत', असं सूचक वक्तव्यही  उद्धव  ठाकरे यांनी केलं. प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणूक पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ते बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

शर्मा यांनी ३५ वर्षांच्या सेवेनंतर जुलै २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता त्यानंतर १० सप्टेंबरला त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. ते ठाणे येथे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख होते. शर्मा यांनी १०० हून अधिक गुन्हेगारांना चकमकीत मारल्याचे बोलले जाते. 

भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय म्हंटलय?

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, भास्कर जाधव यांचे शिवसेनेत स्वागत करत लढवय्या शिवसैनिक परत घरात आला असल्याची प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी दिली.