पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसची १२५ पैकी १०४ नावे निश्चित, या नेत्यांना उमेदवारी पक्की

बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी

काँग्रेस लढविणार असलेल्या १२५ जागांपैकी १०४ जागांवरील उमेदवारांची नावे पक्षाच्या निवड समितीने निश्चित केली आहेत. या नावांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याही नावाचा समावेश आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी ही माहिती दिली. काँग्रेसच्या पहिल्या ५० उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर होणार असे आधीच सांगण्यात आले होते.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; मध्य रेल्वे उशिराने

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात येणार आहेत. मित्रपक्षांमध्ये समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष यांचा समावेश आहे. आता वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही निवडणूकपूर्व आघाडी होणार नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे जागा वाटप जाहीर झाले असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचे अद्याप काहीही स्पष्ट नाही. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. 

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि नाना पटोले यांच्या नावाचा विधानसभा निवडणुकीसाठी विचार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे के सी पडवी आणि विजय वडेट्टीवार यांनाही उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.