पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसने ५ वरिष्ठ नेत्यांची निवडणूक प्रभारी पदी केली नियुक्ती

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५ वरिष्ठ नेत्यांची राज्याच्या विभागनिहाय निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र विधानसभा नवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी प्रस्तावाला मंजूरी दिली.

 

काँग्रेसची १२५ पैकी १०४ नावे निश्चित, या नेत्यांना उमेदवारी पक्की

काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची विदर्भ विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांची मुंबई विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. पक्षाचे वरिष्ठ नेते रजनी पाटिल यांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. आरसी खुनटिया यांची उत्तर महाराष्ट्र विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची मराठवाडा विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; मध्य रेल्वे उशिराने

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपाबाबतचा निर्णय झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष १२५-१२५ जागांवर निवडणूक लढणार आहेत. तर मित्र पक्षांना त्यांनी ३८ जागा दिल्या आहेत. दरम्यान, आज काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीसाठी १०४ उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. 

वॉशिंग्टनमध्ये रस्त्यावर गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच जखमी