पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भास्कर जाधव यांच्या शिवसेनाप्रवेशापूर्वी घडला हा भन्नाट किस्सा!

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. पण या प्रवेशापूर्वी घडलेल्या वेगवान घडामोडी फारच रोचक आहेत. आजपासून पितृ पंधरवडा सुरू होतो आहे. हा महिना नव्या कामांसाठी, नव्या सुरुवातीसाठी हिंदू समाजात अपवित्र समजला जातो. त्यामुळे त्यापूर्वीच भास्कर जाधव यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. त्यासाठी त्यांनी थेट विशेष विमानाने औरंगाबाद गाठले आणि तिथे आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. दुसरीकडे भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे हे दुचाकीवर बसून भाजपच्या एका कार्यकर्त्यांच्या घरी आले होते. या वेगळ्या किस्स्याची शुक्रवारी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती.

आता मोबाईल चोरीला गेल्यास काळजी करू नका, सरकारचा नवा उपक्रम मदतीला

शिवसेनेत प्रवेशाबद्दल भास्कर जाधव यांचा निर्णय झाल्यावर त्यांना आमदारकीचा राजीनामा देणे क्रमप्राप्त होते. पण हरिभाऊ बागडे मुंबईऐवजी औरंगाबादमध्ये दौऱ्यावर होते. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला जाणे आवश्यक होते. यासाठी विशेष विमानाने भास्कर जाधव, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे आमदार अनिल परब हे सर्वजण औरंगाबादला पोहोचले. अगदी ऐनवेळी हा सगळा कार्यक्रम ठरला.

या संदर्भात हरिभाऊ बागडे हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाले, मी औरंगाबाद जिल्ह्यात कुंबेफळमध्ये दौऱ्यावर होतो. मला करमाड आणि बीडमध्ये काही कार्यक्रमांनाही जायचे होते. जर मी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी मोटारीने गेलो असतो, तर मला रेल्वे क्रॉसिंग ओलांडून जावे लागले असते. त्यात जास्त वेळ गेला असता. जेव्हा त्यांनी मला फोन केला. तेव्हा मी त्यांना कुंबेफळमध्ये भाजपचे कार्यकर्ते राम शेळके यांच्या घरी बसण्यास सांगितले. मी तिथेच येतो असाही निरोप दिला. जेव्हा मी पायी चालत रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होतो. त्यावेळी माझ्या ओळखीचा एक दुचाकीस्वार तिथे मला दिसला. त्याने माझ्याकडे त्याच्या गाडीवरून येण्याची विनंती केली आणि मी त्याच्या गाडीवर बसलो. या सगळ्यामध्ये मी केवळ माझे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उदयनराजे मुख्यमंत्र्यांसोबत विमानाने दिल्लीत, खासदारकीचा राजीनामा

भास्कर जाधव म्हणाले, गुरुवारपर्यंत माझ्या घरी गणपती असल्यामुळे मला घरीच थांबावे लागणार होते. नियमाप्रमाणे दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आधीच्या पक्षाच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणे आवश्यक होते. म्हणूनच आम्ही विमानाने औरंगाबादला गेलो.