पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नाणारचं' जे झालं तेच 'आरेचं' होईल, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (शिवसेना टि्वटर)

मोदी सरकारने काश्मीरसारखा धाडसी निर्णय राम मंदिराबाबतही घेण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. १९९०-९२ पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. राम मंदिराबाबत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ठाम होती. न्यायालयाने राम मंदिर बाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही त्यांनी म्हटले. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला विरोध कायम असल्याचे सांगत 'नाणारचं जे झालं तेच आरेचं होईल' असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

काँग्रेस नेते सत्यजित देशमुखांनी भाजपमध्ये केला प्रवेश

ते पुढे म्हणाले, काश्मीरसारखे धाडसी पाऊल सरकारने राम मंदिराबाबतही उचलावे. ज्यावेळी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळीही शिवसेना राम मंदिराबाबत ठाम होती. वेळप्रसंगी राम मंदिरासाठी वेगळा कायदा करा. राम मंदिराची निर्मिती ही व्हायलाच हवी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, इच्छुक हे इच्छुक असतात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण आढावा माझ्याकडे येईल तेव्हा मी याबाबत पाहीन. 

तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे

'सामना'च्या अग्रलेखात उदयनराजेंचा अपमान केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाकिस्तानविषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. आरेतील वृक्षतोडीस विरोधही दर्शवला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election 2019 shiv sena party chief uddhav thackeray speaks on ram mandir and aarey forest