पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाचारी स्वीकारणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवारांचे वक्तव्य

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. पक्षातून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. गेलेल्यांची चर्चा बंद करा, आता येणाऱ्यांची चर्चा करा. भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल, असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 

तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे

ते पुढे म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली. १९६५ साली तरुणांचे नेतृत्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. हा जिल्हा यशवंतरावज चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. 

यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणारे मोहिते-पाटील, दिलीप सोपल, बागल यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्याला येथील लोक जागा दाखवतात. सोलापूर जिल्ह्याचा हा इतिहास आहे. विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल. सबंध राज्य आणि देशात वेगळे चित्र आहे. 

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील लोकांची अवस्था काय होत असेल, असा सवाल करत आजचे राज्यकर्ते काय करतात, अशी विचारणाही त्यांनी केली.

 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election 2019 ncp leader sharad pawar slams on political leader who left ncp in solapur