पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे

शिवेंद्रसिंह राजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करुन भाजपत दाखल झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. माझी कुठलीही संस्था अडचणीत नाही. आपण कोणत्याही चौकशीला घाबरुन भाजप प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिकार करुन खाणाऱ्यांची आमची औलाद आहे, तुकड्यांवर जगणाऱ्यांची नाही, असे म्हणत मंत्रिपदासाठी आपण भाजपत गेले नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात: मुख्यमंत्री फडणवीस

सातारा येथे आलेल्या महाजनादेश यात्रेत ते बोलत होते. मी भाजपत येण्यासाठी कोणतीही वैयक्तिक गोष्ट मागितलेली नाही. जे काही मागितले ते साताऱ्याच्या जनतेसाठी मागितले आहे. 

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या एका पक्षाच्या (राष्टवादीच्या) यात्रेत मी मंत्रिपदाच्या तुकड्यापायी भाजपत गेल्याची टीका करण्यात आली. पण तुकड्यांवर आमचं जमत ही नाही आणि भागतही नाही. तुकड्यांवर जगणाऱ्यांची आमची औलाद नाही, असे ते म्हणाले. 

काम केल्यामुळंच भाजपला मतदान, ईव्हीएमवरुन उदयनराजेंचं घुमजाव

मुख्यमंत्र्यांबरोबर मैत्री आणि चंदक्रांत पाटलांचा आशीर्वाद कायम राहावा याच दोन गोष्टी मी मागितल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेरही म्हटला.

शेतकरी आत्महत्याप्रकरणी खासदार ओमराजे राजेनिंबाळकरांवर गुन्हा