पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास, भाजपत प्रवेश करणारः राणे

नारायण राणे

मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. त्यांनी मला शब्द दिलेला आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबईत मी प्रवेश करेल, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचे नारायण राणे यांनी स्वागत केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले. 

'नाणारचं' जे झालं तेच 'आरेचं' होईल, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

नितेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपच्या तिकीटावरच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करतानाच आपण स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी ज्या दिशेने जाईन त्या दिशेचे पारडे जड होते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलेला आहे. ते दिलेला शब्द पाळतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. शिवसेनेच्या विरोधाचा काही प्रश्नच नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे