पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BJP प्रवेशानंतर कोकण 'भाजपमय' करेन : नारायण राणे

नारायण राणे

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीचा मुद्दा माझा विषयच नाही. पण पुढील आठ दिवसांत माझा भाजप प्रवेश निश्चित आहे, असे खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. माझ्या भाजप प्रवेशाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: करतील, असेही राणेंनी यावेळी सांगितले.   

'मोठ्या भावाप्रमाणे बाळासाहेबांनी एकत्रित लढण्याबाबत निर्णय घ्यावा'

राणे पुढे म्हणाले की, मी शिवसेना कोकणात आणली, काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार खासदार निवडून आणले. आता यावेळेला भाजपने प्रवेश दिल्यास दोन्ही जिल्ह्यात भाजपचे खासदार आमदार दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपात प्रवेश करण्याबाबतची माझी भूमिका सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सांगितली. कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेणे योग्य नव्हते. त्यामुळेच त्यांचे मत जाणून घेतले. सर्वांनी अनुमती दिली. ज्याप्रमाणे  शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते माझ्यासोबत राहिले त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही ते माझ्यासोबत आले. यावेळी देखील जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्याबरोबर भाजपात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस

दोन तीन दिवसांत नाणार प्रकल्प उभारणार नाही. त्यामुळे याबाबतची माझी भूमिका भाजप प्रवेशानंतर स्पष्ट करेन, असेही त्यांनी सांगितले. भाजप शिवसेना यांच्यातील युतीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की,  शिवसेनेच्या बदललेल्या सुराचा माझ्याशी काय संबंध? मी त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही.