पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला खडकवासला मतदारसंघ!

खडकवासला धरण याच मतदारसंघात येते

सन २००९ ला मतदारसंघ पुनर्रचनेत उदयास आलेला पुणे शहराजवळील नवीन मतदारसंघ म्हणजे खडकवासला. पूर्वीचा मुळशी आणि पर्वती मतदारसंघ यांचा बराचसा भाग खडकवासला मतदारसंघाला जोडला गेला आहे. धनकवडी, कात्रज, भुसारी कॉलनी, बावधनचा काही भाग, वारज्यापासून पुढे खडकवासल्यापर्यंत आणि आनंदनगर सिंहगड रोडपासून सिंहगड किल्ल्यापर्यंत अशा विस्तीर्ण परिसरात हा मतदारसंघ विभागाला गेला आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये मतदारसंघाची विभागणी झाली आहे. अनेक महत्वाच्या केंद्रीय संस्था आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे या मतदारसंघामध्ये आहेत. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेला सिंहगड किल्ला आणि त्याचे ऐतिहासिक महत्व ह्या भागाची ओळख आहे.

२००९ साली खडकवासला मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान दिवंगत रमेश वांजळे याना मिळाला. मनसे कडून त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. भाजपचे भीमराव तापकीर २०१२ च्या पोटनिवडणुकीत निवडून आले. मग २०१४ साली झालेल्या निवसडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले.

BLOG : पुण्याचा कॉस्मोपॉलिटिकल चेहरा, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ

अनधिकृत बांधकामे, नदीपात्रातील अतिक्रमणे, गुंठेवारी, BDO मधील बांधकामे, सिंहगड पुरातत्व खात्याचे विषय, रस्त्याचे प्रश्न असे अनेक विषय या मतदारसंघात आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रश्न आहेत. पुणे शहराच्या तिन्ही बाजू या मतदारसंघात येतात. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणारी उपनगरे येथे आहेत. देशाच्या विविध भागातून उपजीविकेसाठी येणारे स्थलांतराचे लोंढे ही तर जटील समस्या बनत चालली आहे.

राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आधी मनसे आणि नंतर भाजपनी हिरावून घेतला. २००७ आणि २०१२ च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वाधिक असताना देखील त्यांचा आमदार निवडून आला नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे पक्षात असणारी गटबाजी. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नावालाच शिल्लक राहिले आहे. शिवसेना तग धरून असली तरी नगरसेवक निवडून आलेले नाहीत. रमेश वांजळेंच्या निधनानंतर मनसे अस्तित्वसाठी लढतीये. राष्टवादीमध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे. परंतु, गटबाजी झाली नाही तरच भाजपच्या उमेदवाराला ते टक्कर देऊ शकतील. २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे खडकवासला मतदारसंघामध्ये पिछाडीवर होत्या. आताच्या निवडणुकीत तर तब्बल ६५ हजारांनी मागे पडल्या होत्या. २०१४ विधानसभेला सुमारे ६० हजार मतांनी भीमराव तापकीर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे भाजपमध्ये खूप इच्छुक तयार झाले आहेत. गटबाजी पण वाढतीये. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत त्याचे प्रतिबिंब बघायला मिळाले.  

तिसऱ्या वेळेस भाजप जागा जिंकून हॅट्रिक करण्याच्या मार्गावर आहे की राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उतरून पहिल्यांदा आमदार बनवणार ह्याचे उत्तर पुढील महिन्यात मिळेलच.

- महेश साने
maheshsane15@gmail.com