पुढील बातमी

राहुल-रोहित-विराट या त्रिदेवांसमोर विंडीज संघ हतबल

राहुल-रोहित-विराट या त्रिदेवांसमोर विंडीज संघ हतबल

सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या शतकी भागीदारीनंतर कर्णधार कोहलीने केलेल्या तुफान फटकेबाजीसमोर विंडीजचा अख्खा संघ हतबल ठरला. भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारु शकला. वानखेडेच्या मैदानात रंगलेला तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना ६७ धावांनी जिंकत भारताने ही मालिका खिशात घातली आहे. 

INDvsWI: धोनी कमबॅक पंतविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पोलार्डचा हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी फोल ठरवला दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा अवघ्या ३४ चेंडूत ७१ धावा करुन परतल्यानंतर विराट कोहलीने ऋषभ पंतला बढती दिली. पोलार्डने पंतला खातेही उघडू दिले नाही.  त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने लोकेश राहुलसह ९५ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल ५६ चेंडूत ९१ धावांची खेळी करुन मागे फिरला. विराट कोहलीने २९ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकात ३ बाद २४० धावांचा डोंगर उभारला होता.

हिटमॅन रोहितनं कॉट्रेलला षटकार खेचत रचला अनोखा विक्रम

या धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवातच खराब झाली. शमी -भुवी जोडीने सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडत विंडीजला बॅकफूटव धाडले. यातून सिम्रॉन हेटमायर ४१(२४) आणि कर्णधार पोलार्ड ६८(३९) धावांची खेळी वगळता कोणालाही मैदानात तग धरता आला नाही. निर्धारित २० षटकात ८ बाद १७३ धावांत विंडीजला थांबवत भारताने मालिका खिशात घातली. भारताकडून दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन-दोन गड्यांना तंबूत धाडले.

Wed, 11 Dec 2019 10:52 PM IST

विंडीज निर्धारित २० षटकात ८ बाद १७३ धावा

भारताने ६७ धावांसह सामन्यासह मालिका २-१ अशी खिशात घातली.

Wed, 11 Dec 2019 10:52 PM IST

विंडीजला आठवा धक्का!

खॅरी पीएरीच्या रुपात दीपक चाहरने सामन्यातील दुसरा गडी बाद केला 

Wed, 11 Dec 2019 10:33 PM IST

हेडन वॉल्श तंबूत, विंडीजला सातवा धक्का

शमीने ११ धावांवर खेळणाऱ्या वॉल्शचा त्रिफळा उडवला
 

Wed, 11 Dec 2019 10:28 PM IST

पोलार्डचा खेळ खल्लास, विंडीजला सहावा धक्का

कर्णधार पोलार्डने ३९ चेंडूत ६८ धावांची खेळी करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला.

Wed, 11 Dec 2019 10:27 PM IST

विंडीजचा अर्धा संघ तंबूत

जेसन होल्डर ८ धावा करुन माघारी, कुलदीपला दुसरे यश

Wed, 11 Dec 2019 10:26 PM IST

हेटमायर कुलदीपच्या जाळ्यात, भारताला चौथे यश

शेम्रॉन हेटमायरने २४ चेडूत ४१ धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीपने त्याला लोकेश राहुलकरवी झेलबाद करत तंबूत धाडले

Wed, 11 Dec 2019 10:24 PM IST

भारताला तिसरे यश

दीपक चाहरने निकोलस पूरनला आल्या पावली माघारी धाडले

Wed, 11 Dec 2019 10:23 PM IST

शमीने केली  लेंडल सिमन्सची शिकार

सलामीवीर सिमन्स अवघ्या ७ धावांची भर घालून माघारी फिरला

Wed, 11 Dec 2019 10:22 PM IST

भुवीने भारताला मिळवून दिले पहिले यश

दुसऱ्याच षटकात ब्रँडन किंगच्या रुपात भारताला पहिले यश, भुवनेश्वरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला

Wed, 11 Dec 2019 09:22 PM IST

निर्धारित २० षटकात भारत ३ बाद २४० धावा

लोकेश राहुल ९१ (५६)
रोहित शर्मा ७१ (३४)
विराट कोहली ७० (२९)*

Wed, 11 Dec 2019 08:41 PM IST

विराट कोहलीचे अर्धशतक!

पोलार्डच्या गोलंदाजीवर षटकार खेचत कर्णधार विराट कोहलीने पूर्ण केलं अर्धशतक

Wed, 11 Dec 2019 08:18 PM IST

पंत अपयशी खातेही न उघडता माघारी

पोलार्डने पंतला शून्यावर बाद केलं

Wed, 11 Dec 2019 08:08 PM IST

रोहित शर्मा माघारी, भारताला पहिला धक्का

रोहित शर्माने ३४ चेंडूत ७१ धावा केल्या. यात त्याने ५ चौकार आणि ६ षटकार खेचले

Wed, 11 Dec 2019 07:45 PM IST

लोकेश राहुल-रोहित शर्मा यांच्यात शतकी भागीदारी

Wed, 11 Dec 2019 07:43 PM IST

रोहित शर्माचे अर्धशतक!

मागील दोन सामन्यातील अपयश भरून काढत रोहित शर्माने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Wed, 11 Dec 2019 07:06 PM IST

लोकेश राहुल आणि रोहित शर्माने केली भारताच्या डावाची सुरुवात

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. 

Wed, 11 Dec 2019 06:53 PM IST

नाणेफेक जिंकून विंडीजने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मुंबईच्या मैदानात नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेच्या मैदानात आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ५ तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १ सामना जिंकला आहे. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:राहुल-रोहित-विराट या त्रिदेवांसमोर विंडीज संघ हतबल