पुढील बातमी

पाकविरुद्ध सलामी जोडगोळी पुरुन उरली, युवा टीम इंडिया फायनलमध्ये

पाकविरुद्ध सलामी जोडगोळी पुरुन उरली, युवा टीम इंडिया फायनलमध्ये

युवा टीम इंडियाने सेमीफायनलच्या लढतीत पाकिस्तानला एकतर्फी नमवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलाय. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दिलेल्या १७३ धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना हे दोघे विजय मिळवून नाबाद परतले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने षटकार  खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या षटकारासह त्याने आपले शतकही पूर्ण केले. जैस्वालने नाबाद १०५ धावा केल्या तर सक्सेनाने ५९ धावांची नाबाद खेळी करुन त्याला उत्तम साथ दिली. 

Video : पाकविरुद्धच्या सामन्यातील हा अप्रतिम झेल पाहिलात का?

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पोचेफस्ट्रमच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ ४१. १ षटकात १७२ धावांतच आटोपला होता. नाणेफेक जिंकून पाक कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर हैदर अली ५६ (७७), कर्णधार रोहेल नाझीर ६२(१०२),  मोहम्मद हॅरिस २१ (१५) धावा वगळता कोणत्याही फंलदाजाला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक तीन बळी टिपले. कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन-दोन तर अंकोलेकर आणि जैस्वाल यांनी एक-एक गडी बाद करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग ११ वा विजय आहे. 

घायाळ किवींचा जीव पुन्हा धोक्यात, संघासमोर केनविना खेळण्याची 'कसोटी'  

Tue, 04 Feb 2020 07:59 PM IST

जैस्वालने षटकाराने शतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शतकी मोहर उमटवली

भारतीय संघाने १० गडी आणि १४.४ षटके राखून पाकिस्तानला नमत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Tue, 04 Feb 2020 07:24 PM IST

जैस्वाल पाठोपाठ सक्सेनाचीही अर्धशतकाला गवसणी!

दिव्यांश सक्सेनाने देखील साजरे केलं अर्धशतक

Tue, 04 Feb 2020 07:22 PM IST

दिव्यांश-यशस्वी सलामीवीरांचा विक्रम!

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी रचण्याचा विक्रम दिव्यांश आणि यशस्वीने आपल्या नावे केला आहे. 

Tue, 04 Feb 2020 07:20 PM IST

सलामीवर जैस्वालचे अर्धशक!

अमिर खानच्या गोलंदाजीवर चौकार खेचत सलामीवीर यशस्वी जैस्वालचे स्पर्धेतील आणखी एक अर्धशतक झळकावले.

Tue, 04 Feb 2020 06:25 PM IST

भारतीय सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी

जैस्वाल आणि सक्सेना जोडीने संयमी खेळ करत पाक गोलंदाजांचे खांदे पाडले असून या जोडीनं अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. 

Tue, 04 Feb 2020 06:02 PM IST

भारतीय सलामीवीरांची संयमी सुरुवात!

पहिल्या पॉवर प्लेमध्ये जैस्वाल-सक्सेना जोडीची ३३ धावांची भागीदारी

Tue, 04 Feb 2020 05:05 PM IST

४३.१ षटकात अवघ्या १७२ धावांत पाकिस्तानचा खेळ खल्लास!

सुशांत मिश्राने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर  बिश्नोई त्यागी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Tue, 04 Feb 2020 04:48 PM IST

त्यागीनं केली ताहिरची शिकार, पाकचा नववा गडी तंबूत!

कार्तिक त्यागीनं तळाच्या फलंदाजीतील ताहिरला अवघ्या दोन धावांवर यष्टीमागे झेलबाद केले. 

Tue, 04 Feb 2020 04:45 PM IST

पाक कर्णधाराच्या रुपात भारताला आठवे यश!

सुशांत मिश्राने ६२ धावांवर खेळणाऱ्या पाक कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवला. रोहेल नाझील बाद झाल्यामुळे पाकिस्तानला दोनशेपार करणेही मुश्किल दिसत आहे. 

Tue, 04 Feb 2020 04:34 PM IST

कर्णधार रोहेल एकाकी झुंजतोय, पण...

पाकचा कर्णधार रोहेल नाझीरने अर्धशतकी खेळी केली असून एका बाजूने विकेट पडत असताना तो संघाचा डाव सावरताना दिसतोय. 

Tue, 04 Feb 2020 04:31 PM IST

आफ्रिदीच्या रुपात पाकला सातवा धक्का!

रवी बिश्नोईने अब्बास आफ्रिदीला अवघ्या दोन धावांवर पायचित करत तंबूत धाडले. 

Tue, 04 Feb 2020 04:29 PM IST

पाकचा सहावा गडी माघारी!

कार्तिक त्यागीने इरफान खानच्या रुपात पाकला सहवा धक्का दिला. 

Tue, 04 Feb 2020 04:05 PM IST

पाकचा अर्धा संघ तंबूत!

अंकोलेकरच्या षटकात उत्तुंग फटका मारण्याच्या नादात मोहम्मद हॅरिस बाद, सक्सेनाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. हॅरिसने १५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांची खेळी केली.
 

Tue, 04 Feb 2020 03:48 PM IST

फलंदाजांमधील ताळमेळाच्या अभावामुळे पाकला चौथा धक्का!

पाक कर्णधार रोहेल नाझीर आणि कसीम आक्रम यांच्यात ताळमेळाचा अभाव, पाकिस्तानने गमावली नाहक विकेट
 

Tue, 04 Feb 2020 03:25 PM IST

यशस्वी जैस्वालने अली धाडले माघारी, पाकला तिसरा धक्का!

अर्धशतकी खेळी करुन पाकचा डाव सावरणाऱ्या हैदर अलीला जैस्वालने ५६ धावांवर बाद केले. 

Tue, 04 Feb 2020 03:16 PM IST

पाकिस्तानी सलामीवीर हैदर आलीचं अर्धशतक!

पाकिस्तानचा सलामीवीर फंलदाज हैदर अलीने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला असून त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले आहे.

Tue, 04 Feb 2020 02:15 PM IST

पाकला दुसरा धक्का!

रवी बिश्नोईनं पाकिस्तानच्या मोहम्मद फहाद मुनीरला खातेही उघडू दिले नाही. १६ चेंडू खेळूनही त्याला धाव काढता आली नाही.

Tue, 04 Feb 2020 01:46 PM IST

पाकला पहिला धक्का!

सुशांत मिश्राने पाकिस्तानला दिला पहिला धक्का, मोहम्मद हुरैरा अवघ्या ४ धावा करुन माघारी

Tue, 04 Feb 2020 01:39 PM IST

पाकची सलामी जोडी मैदानात!

मोहम्मद हुरैरा आणि हैदर यांनी पाकिस्तानच्या डावाला सुरुवात केली आहे.

Tue, 04 Feb 2020 01:34 PM IST

पाकिस्तानी कर्णधाराने नाणेफेक जिंकली

पाकिस्तानी कर्णधार रोहेल नाझील याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:पाकविरुद्ध सलामी जोडगोळी पुरुन उरली, युवा टीम इंडिया फायनलमध्ये