पुढील बातमी

ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर मंगळवारी राज्यसभेचीही मंजुरीची मोहोर उमटली. यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या इतिहासातील हे ऐतिहासिक विधेयक याआधी दोन वेळा राज्यसभेत फेटाळण्यात आले होते. पण यावेळी सत्ताधारी पक्षाने योग्य पद्धतीने नियोजन केल्याने राज्यसभेत बहुमत नसतानाही तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर करण्यात यश मिळाले. राज्यसभेत हे विधेयक ९९   विरुद्ध ८४  मतांनी मंजूर झाले. यामुळे यापुढे मुस्लिम विवाह पद्धतीने निकाह झालेल्यांना तीन तलाक पद्धतीने महिलेला घटस्फोट देता येणार नाही. तसे केल्यास तो गुन्हा ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याआधीचे तिहेरी तलाक चुकीचे असल्याचे सांगत त्याविरोधात निकाल दिला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारने या संदर्भात कायदा करावा, असे आदेश दिले होते. पण राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश येत होते. लोकसभा निवडणुकीनंतर १७ व्या लोकसभेमध्ये पहिल्याच अधिवेशनात हे विधेयक लोकसभेमध्ये २५ जुलैला मंजूर करून घेण्यात आले होते. मंगळवारी सकाळी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. 

 

Tue, 30 Jul 2019 06:25 PM IST

विधेयकातील सुधारणा तरतुदींवर मतदान सुरु

विधेयकावरील मतदानापूर्वी विधेयकातील काही सुधारणेसंदर्भातील सूचनांवर मतदान घेण्यात येत आहे. चिठ्ठीच्या माध्यमातून मतदान होत असल्यामुळे मतदान प्रक्रिया उशीर होत आहे.

Tue, 30 Jul 2019 06:18 PM IST

विरोधकांचा प्रस्ताव फेटाळला, विधेयक सिलेक्ट कमिटीकडे जाणार नाही

विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी १०० विरुद्ध ८४ फरकाने फेटाळण्यात आली आहे, 

Tue, 30 Jul 2019 06:16 PM IST

शरद पवार, प्रफुल पटेल गैरहजर!

महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रियेवेळी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल सभागृहात अनुपस्थितीत

Tue, 30 Jul 2019 06:14 PM IST

विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी

विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली असून भाजपने याला विरोध केला आहे.

Tue, 30 Jul 2019 06:09 PM IST

तिहेरी तलाक विधेयकावरील मतदान करण्याच्या प्रक्रियाला सुरुवात

लोकसभेत तिसऱ्यांदा मंजुरीनंतर तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tue, 30 Jul 2019 02:17 PM IST

वायएसआर काँग्रेस तिहेरी तलाक विधेयकाचा विरोध करणार

Tue, 30 Jul 2019 12:30 PM IST

तिहेरी तलाक विरोधी विधेयक २५ जुलैला लोकसभेत मंजूर झाले होते

२५ जुलैला लोकसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला होता.

Tue, 30 Jul 2019 12:21 PM IST

स्त्री-पुरुष समानतेसाठी हे विधेयक महत्त्वाचे - रविशंकर प्रसाद

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर