पुढील बातमी

IndvsSL: नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पाऊस ठरला सामनावीर!

IndvsSL: नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पाऊस ठरला सामनावीर!

भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ गुवाहाटीच्या मैदानातील टी-२० सामन्याच्या माध्यमातून नव्या वर्षातील सलामीचा सामना खेळणार होते. नियोजित वेळेनुसार नाणेफेक झाली. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे तीन सामन्यातील पहिला सामना अखेर रद्द करावा लागला,  यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टिने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Video : पावसानं चाहत्यांना निराश केलं, पण...विराटनं खूश केलं

नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मात्र पावसाने सामन्यावर पाणी फिरवले. पाऊस थांबल्यानंतर किमान प्रत्येकी ५-५ षटकांचा तरी सामना होईल, अशी आस होती. मात्र पावसानंतर मैदानातील ओलाव्यासमोर हा निर्णय घेणं पचांना शक्य झालं नाही. परिणामी नव्या वर्षाची सुरुवात पावसाने सामना रद्द होण्याने झाल्याचे पाहायाल मिळाली. नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पावसाने मॅन ऑफ द मॅच मिळवली असेच म्हणावे लागेल.

Video : असं कवा कुणी 'बोल्ड' होतं का राव!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदुरच्या मैदानात खेळवण्यात येणार असून त्यानंतर तिसरा सामना हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानात खेळवण्यात येणार आहे. तीन पैकी केवळ दोन सामने शिल्लक राहिल्यामुळे मालिका विजयासाठी दोन्गी सामने जिंकण्याच्या इराद्याने  भारत-श्रीलंका यांना मैदानात उतरावे लागेल. ७ जानेवारीला इंदुरमध्ये कोण विजयी सुरुवात करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Sun, 05 Jan 2020 09:35 PM IST

प्रत्येकी पाच षटकांचा सामनाही होऊ शकतो

नियोजित वेळेत सुरु न होऊ शकलेला सामना प्रत्येकी पाच-पाच षटके खेळवण्याच निर्णय देखील घेतला जाऊ शकतो.

Sun, 05 Jan 2020 09:24 PM IST

पाऊस थांबला, पण सामना लांबणार की थांबणार हे पंचांच्या पाहणीनंतर ठरणार

पंच मैदानाची ९.३० मिनिटांनी पाहणी करुन सामन्यासंदर्भातील माहिती देणार आहेत. 

Sun, 05 Jan 2020 07:36 PM IST

नाणेफेकीनंतर धावांची नव्हे पावसाची बरसात, खेळ सुरु होण्यास विलंब

गुवाहाटीच्या मैदानात धावांचा पाऊस पडण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे खेळ नियोजित वेळेत सुरु झालेला नाही.

Sun, 05 Jan 2020 06:46 PM IST

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. श्रीलंकेला त्याने फलंदाजीला निमंत्रित केले.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IndvsSL: नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पाऊस ठरला सामनावीर!