कर्जमाफीचे पैसे गेले कुठे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, कर्जमाफीसाठी सगळे पैसे बँकांना दिले आहेत. सरकारने जर पैसे दिले असतील आणि शेतकऱ्यांना ते मिळाले नसतील तर मग ते गेले कुठे ?- उद्धव ठाकरे
टीकेची पर्वा करत नाही- उद्धव ठाकरे
आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या रक्तात भेसळ झाली आहे. ती त्यांनी तपासून बघावी. या मोर्चावर टीका करणाऱ्यांच्या टीकेची आम्ही पर्वा करत नाही
शेतकऱ्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही का- उद्धव ठाकरे
जो शेतकरी धान्य पिकवतो, देशाच्या रक्षणासाठी आपल्या पोटचा मुलगा देतो त्या शेतकऱ्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल
१५ दिवसांत न्याय द्या, नाहीतर ..
या कंपन्यांनी १५ दिवसांत जर न्याय दिला नाही तर १६ व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल- उद्धव ठाकरे
बँकांनाही दिला इशारा
बँक खात्यातून शेतकऱ्यांची फसवणूक करु नका. विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- उद्धव ठाकरे
मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधील- उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे यांची काँग्रेसवर मोर्चा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी झाले असून ते वांद्रे येथील बीकेसी मैदानावर चालत जातील
विमा कंपन्यांच्या मनमानीविरोधात शिवसेनेचा मोर्चा
या मोर्चात मोठ्याप्रमाणात शेतकरी सहभागी झाले असून शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी यांचाही यात समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, आदित्य ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती.
भारती अक्सा कार्यालयावर जाणार मोर्चा
पीकविम्याच्या प्रश्नावरुन शिवसेनेचा मोर्चा हा भारती अक्सा विमा कंपनीच्या कार्यालयावर जाणार आहे.