पुढील बातमी

प्रामाणिकपणे युतीचे काम करा आणि भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

प्रामाणिकपणे युतीचे काम करा आणि भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे युतीचे काम करा आणि विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात केले. मुंबईत दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी आपण भाजपशी युती का केली, या मागील भूमिका स्पष्ट केले. त्याचबरोबर मला सत्ता हवी आहे. त्यामध्ये लपविण्यासारखे काहीही नाही, असेही सांगितले.

Tue, 08 Oct 2019 08:51 PM IST

प्रामाणिकपणे युतीचे काम करा आणि भगवा फडकावा - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:49 PM IST

डोक्यात सत्ता गेली तर रस्त्यावरचे कुत्रेही विचारणार नाही - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:46 PM IST

आजपर्यंत इतिहास युवकांनीच घडवला आहे - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:40 PM IST

पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

Tue, 08 Oct 2019 08:38 PM IST

बांगला घुसखोरांना लाथ घालून हाकलून द्या - उद्धव ठाकरेंची अमित शहांकडे मागणी

Tue, 08 Oct 2019 08:34 PM IST

प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात शिवसैनिकाचा विचार असतो

Tue, 08 Oct 2019 08:32 PM IST

अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आले - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:30 PM IST

शिवसेना कोणासमोर झुकणार नाही, मरेन नाही तर मारेन हीच आमची जात - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:28 PM IST

आमचा कारभार प्रभू रामचंद्रासारखा असेल - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 08:28 PM IST

विशेष कायदा करा आणि अयोध्येत राम मंदिर करा - उद्धव ठाकरे

Tue, 08 Oct 2019 07:42 PM IST

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला सुरुवात

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात उध्दव ठाकरे दाखल होणार आहेत. 

Tue, 08 Oct 2019 07:38 PM IST

दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित

शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली आहे. उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:प्रामाणिकपणे युतीचे काम करा आणि भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन