पुढील बातमी

शिवतीर्थावर जात फडणवीसांनी बाळासाहेबांना केलं अभिवादन

शिवतीर्थावर जात फडणवीसांनी बाळासाहेबांना केलं अभिवादन

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक होत होत आहेत. शनिवारपासूनच शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले.

राज्यात गेल्या पाच वर्षांत युतीची सत्ता असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेते या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहत असत. मात्र सध्या शिवसेना व भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असल्याने या स्मृतिस्थळाला भाजप नेते, आमदार व पदाधिकारी भेट देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही भाजप नेत्यांनी स्मृतीस्थळी उपस्थिती लावली. 

Sun, 17 Nov 2019 01:29 PM IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृतीस्थळावर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्यांच्याबरोबर विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थितीत होते. यावेळी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.

Sun, 17 Nov 2019 01:13 PM IST

भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडेनी घेतले स्मृतीस्थळाचं दर्शन

माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

Sun, 17 Nov 2019 01:01 PM IST

मुस्लिम बांधवांनीही वाहिली आदरांजली

मुस्लिम बांधवांची बाळासाहेबांना आदरांजली, अजमेर शरीफची  चादर अर्पण करून अभिवादन.

Sun, 17 Nov 2019 01:00 PM IST आदित्य आणि तेजस ठाकरे (Hindustan Times/ Kunal Patil)

आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर दाखल

वरळी मतदारसंघाचे आमदार आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

Sun, 17 Nov 2019 11:59 AM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्मृतीस्थळावर दाखल

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंसह शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यभरातून आलेले शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आदी उपस्थित आहेत.

Sun, 17 Nov 2019 11:26 AM IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, सचिन अहिर, आमदार अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले. 

Sun, 17 Nov 2019 11:03 AM IST

बाळासाहेबांची रोज एकदा तरी आठवण येतेः छगन भुजबळ

छगन भुजबळांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा. बाळासाहेबांची रोज आठवण येते, असे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.

Sun, 17 Nov 2019 10:59 AM IST

प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेः शरद पवार

Sun, 17 Nov 2019 10:25 AM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही टि्वट करुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली

Sun, 17 Nov 2019 10:23 AM IST

जयंत पाटील, छगन भुजबळ स्मृतीस्थळावर दाखल

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्मृतीस्थळावर दाखल.

Sun, 17 Nov 2019 10:07 AM IST

शिवसेना नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्यासह उदय सामंत, मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

Sun, 17 Nov 2019 08:37 AM IST

स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिलाः देवेंद्र फडणवीस

Sun, 17 Nov 2019 08:28 AM IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे छायाचित्र शेअर करत आदरांजली वाहिली

Sun, 17 Nov 2019 08:26 AM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी टि्वट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:शिवतीर्थावर जात फडणवीसांनी बाळासाहेबांना केलं अभिवादन