पुढील बातमी

जिओ फायबरची घोषणा; मोफत टीव्ही, १०० MBPS स्पीड

जिओ फायबरची घोषणा; मोफत टीव्ही, १०० MBPS स्पीड

Reliance Industries AGM 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अपेक्षेप्रमाणे मोठ्या घोषणा केल्या. ५ सप्टेंबरला जिओ गिगाफायबरचे व्यावसायिक लाँचिंग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिओ गिगाफायबरच्या प्लॅनची सुरुवात ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत असेल. जिओच्या फायबर वार्षिक स्वागत ऑफर अंतर्गत ४ डी/४ के टेलिव्हिज सेट आणि ४ के सेटटॉप बॉक्स मोफत मिळेल. त्याचबरोबर जिओचा मिक्स रिअॅल्टीही (एमआर) लाँच केला गेला आहे. त्याचे नाव जिओ होलोबोर्ड असेल. लवकरच त्याची बाजारात विक्री सुरु होईल. जाणून घ्या सर्व घोषणांचे अपडेट्स... 

Mon, 12 Aug 2019 12:55 PM IST

जिओ फायबर ग्राहकांना मोफत एचडी टीव्ही

५ सप्टेंबरला सर्व टेरिफ आणि प्लानची माहिती जिओ ऍप आणि जिओच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. जे जिओ फायबर ग्राहक वार्षिक प्लॅन घेतील. त्यांना एचडी आणि ४ के टीव्ही त्याबरोबरच ४ के सेट टॉप बॉक्स मोफत दिला जाईल. त्याला जिओ फायबर वेलकम ऑफर नाव देण्यात आले आहे.

Mon, 12 Aug 2019 12:50 PM IST

स्मार्ट होम सोल्यूशन मोफत

गिगाफायबरची जोडणी घेणाऱ्या सबस्क्रायबर्सना हायस्पीड ब्रॉडबँडशिवाय लँडलाईन कॉलिंग, जिओ आयपीटीव्हीसह स्मार्ट होम सोल्यूशनही मिळेल.

Mon, 12 Aug 2019 12:46 PM IST

ज्या दिवशी चित्रपट रिलिज होईल, त्याचदिवशी पाहता येणार

जिओच्या ग्राहकांना ज्या दिवशी चित्रपट रिलिज होईल, त्याचदिवशी पाहू शकतील. २०२० पासून ही सेवा सुरु होईल. जिओ पोस्टपेड प्लस सेवाही सुरु होईल.

Mon, 12 Aug 2019 12:41 PM IST

वर्षभरात जिओ फायबर

पुढच्या वर्षभरांत जिओ फायबरचे काम पूर्ण होईल- मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:38 PM IST

स्थानिक केबल ऑपरेटर्सला संधी- मुकेश अंबानी

सध्या केबल ऑपरेटर यांचा व्यवसाय संकटात आला आहे. जिओ केबल नेटवर्कला प्रोत्साहन देईल. जिओकडे साधारणपणे २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याची संधी आहे. यामध्ये सर्व केबल ऑपरटेर्सला संधी देण्यात येईल.

Mon, 12 Aug 2019 12:30 PM IST

जिओचे नेटवर्क ५ जी रेडी

मुकेश अंबानींच्या मते जिओचे नेटवर्क ५ जी रेडी आहे. तर वायरलेस नेटवर्क ४ जी युक्त आहे. त्याचे ५ जीमध्ये रुपांतर करता येईल. जिओसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज, होम ब्रॉडबँड सेवा, इंटरप्रायजेस सेवा, लघु उद्योगांसाठी ब्रॉडबँड याचवर्षी सुरु होतील.

Mon, 12 Aug 2019 12:20 PM IST

जिओ अव्वल

जिओ ग्राहकांची संख्या ३४ कोटी झाली आहे. जिओच्या लाँचिंगला यावर्षी ५ सप्टेंबरला ३ वर्षे होतील. प्रत्येक महिन्याला १ कोटी ग्राहक जोडले जात आहेत. सध्या रिलायन्स जिओ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जिओत ३.५ कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.- मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:16 PM IST

सौदी अरमॅकोबरोबर करार

सौदी अरमॅको आणि रिलायन्समध्ये करार. त्यासाठी सौदी अरमॅको ऑईल आणि केमिकल विभागात २० टक्के गुंतवणूक करणार.- मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:13 PM IST

सर्वाधिक जीएसटी भरला

रिलायन्सने ६७,३२० कोटी जीएसटी भरला आहे. तर १२१९१ कोटी प्राप्तिकर भरला आहे.: मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:12 PM IST

रिलायन्स देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी- मुकेश अंबानी

जिओचे ३४.४ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स रिटेलची १३० हजार कोटींची उलाढाल आहे. ही देशातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी आहे. २ व्यवसाय ३२ टक्के ईबीटीमध्ये योगदान देतात. त्यांची हिस्सेदारी ५० टक्के असू शकते.: मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:09 PM IST

सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी

रिलायन्स समूह मागीलवर्षी सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनली आहे. कंपनीचे ३ ग्रोथ इंजिन आहेत. १. ऑईल, २. जिओ आणि रिटेलने चांगली कामगिरी केली आहे.- मुकेश अंबानी

Mon, 12 Aug 2019 12:09 PM IST

रिलायन्स समूहाची वार्षिक सर्वसाधारण बैठक सुरु

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:जिओ फायबरची घोषणा; मोफत टीव्ही, १०० MBPS स्पीड