पुढील बातमी

'राजकारणापलीकडे जाऊन देशवासियांच्या इच्छा, आकांक्षापूर्तीची वेळ'

'राजकारणापलीकडे जाऊन देशवासियांच्या इच्छा, आकांक्षापूर्तीची वेळ'

राजकारणाच्या वर देश असतो, देशातील लोकांच्या भावना, इच्छा, आकांक्षा असतात. त्यांच्या पूर्तीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले. विरोधक इतके उंचावर गेले आहेत की त्यांना आता जमिनीवरील काहीच दिसत नाही. पण आमची मुळे अजून जमिनीशी जोडलेली आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


 

Tue, 25 Jun 2019 06:13 PM IST

राजकारणाच्या वर देश असतो

राजकारणाच्या वर देश असतो, देशातील लोकांच्या भावना असतात, त्यांचा आदर केला पाहिजे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 

Tue, 25 Jun 2019 06:05 PM IST

भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहिल, पण...

भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई सुरूच राहिल. पण ही लढाई म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखे नाही. कोणालाही शिक्षा द्यायचे काम न्यायपालिकेचे आहे. जर न्यायपालिका कोणाला जामीन देत असेल, तर त्याने एन्जॉय करावे. कोणालाही बळजबरीने आम्ही कोठडीत डांबणार नाही.

Tue, 25 Jun 2019 06:00 PM IST

मेक इन इंडियाची चेष्टा करून काहीच उपयोग नाही

मेक इन इंडियाची चेष्टा करून काहीच उपयोग होणार नाही. फक्त रात्री चांगली झोप लागेल. पण देशाचे काहीच भले होणार नाही. 

Tue, 25 Jun 2019 05:52 PM IST

जलसंकटाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे

जलसंकटाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. यासाठीच आम्ही जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे.

Tue, 25 Jun 2019 05:49 PM IST

सत्तेत असताना सबका साथ घेण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न आम्ही केले

सत्तेत असताना 'सबका साथ' घेण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत.

Tue, 25 Jun 2019 05:46 PM IST

देशात आणीबाणी कोणी लागू केली होती?

Tue, 25 Jun 2019 05:43 PM IST

देशासाठी जगण्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची वेळ

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशासाठी जगण्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

Tue, 25 Jun 2019 05:38 PM IST

आणीबाणीच्या वेळी २५ जूनच्या रात्री देशाच्या आत्म्याला पायदळी तुडविण्यात आले

आणीबाणीच्या वेळी २५ जूनच्या रात्री देशाच्या आत्म्याला पायदळी तुडविण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. न्यायालयाचा अनादर म्हणजे काय याचे ते तंतोतंत जुळणारे उदाहरण आहे.

Tue, 25 Jun 2019 05:35 PM IST

आम्ही कोणतेही निर्णय घेताना फक्त कुटुंबाचा विचार करीत नाही

आम्ही कोणतेही निर्णय घेताना फक्त कुटुंबाचा विचार करीत नाही. म्हणूनच आम्ही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कामांचा विचार करून त्यांना भारतरत्न दिले. 

Tue, 25 Jun 2019 05:32 PM IST

विरोधकांनी एकदा तरी मनमोहन सिंग, नरसिंह राव यांचे नाव घ्यायला हवे होते

विरोधकांनी आपल्या भाषणात एकदा तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नरसिंह राव यांचे नाव घ्यायला हवे होते, असे मला वाटते. मी माझ्या भाषणात जुन्या सरकारांच्या चांगल्या कामांचा उल्लेख केला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Tue, 25 Jun 2019 05:30 PM IST

आम्हाला उंच व्हायचेच नाही

उंच व्हायचे आमचे स्वप्नच नाही. जमिनीशी नाते सांगण्याची आमची इच्छा आहे.

Tue, 25 Jun 2019 05:29 PM IST

कोणाची रेषा लहान करण्याचे काम आम्ही करीत नाही

कोणाची रेषा लहान करण्याचे काम आम्ही करीत नाही. आम्ही आमची रेषा मोठी करण्याचे काम करण्यासाठी आयुष्य समर्पित करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Tue, 25 Jun 2019 05:26 PM IST

७० वर्षांतील विकासाचा अनुशेष ५ वर्षांत पूर्ण करणे कठीण

७० वर्षांतील विकासाचा अनुशेष ५ वर्षांत पूर्ण करणे कठीण असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Tue, 25 Jun 2019 05:22 PM IST

प्रतापचंद्र सरंगी यांच्या भाषणानंतर मी काहीच बोलण्याची गरज नाही

केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सरंगी यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या भाषणानंतर खरंतर मी काहीच बोलले नाही तरी चालेल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे

Tue, 25 Jun 2019 05:18 PM IST

मतदारांनी जागरुकपणे मतदान केले

देशातील मतदारांनी विचार करून, सर्व माहिती घेऊन मगच मतदान केले आहे

Tue, 25 Jun 2019 05:16 PM IST

खूप वर्षांनी देशाने मजबूत जनादेश दिला

खूप वर्षाने देशाने एक मजबूत जनादेश दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मतदाता जागरूक आहे. तो आपल्यापेक्षा आपल्या देशावर प्रेम करतो, हे या निवडणुकीतून दिसून आले. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:'राजकारणापलीकडे जाऊन देशवासियांच्या इच्छा, आकांक्षापूर्तीची वेळ'