पुढील बातमी

PM Modi UNGA :आम्ही 'युद्ध' नाही 'बुद्ध' दिले : पंतप्रधान

PM Modi UNGA :आम्ही 'युद्ध' नाही 'बुद्ध' दिले : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून शांततेचा संदेश दिला. भारताने विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, अशा शब्दांत त्यांनी भारताला संपूर्ण विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्तरावर दहशतवाद ही  मोठी समस्या आहे. दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे, असेही मोदी यावेळी म्हणाले. दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला.

... पण मी इंद्राणी मुखर्जींना कधी भेटलोच नाही - चिदंबरम

सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रसंघाला  बळ आणि नवी दिशा द्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या नावाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, १२५ वर्षांपूर्वी विवेकानंदांनी जागतिक सर्वधर्म परिषदेत जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश दिला होता. भारताकडून आजही जगाला हाच संदेश आहे, असे मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात मोदींनी दहशवादाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले. या मुद्यावर दुमत असेल तर तो संयुक्त राष्ट्राच्या सिद्धांतावर अन्याय केल्यासारखे होईल, त्यामुळे सर्व राष्ट्रांनी यावर एकत्र यायला हवे, असे मोदी म्हणाले. 

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले, दोन्ही

ते पुढे म्हणाले की, तीन हजार वर्षांपूर्वी आमच्या देशातील एका तमिळ कवीने सीमेची मर्यादा न ठेवता आपलेपणाची भावना बाळगतो असा उल्लेख आपल्या कवितेतून केला होता. भारताने विश्व बंधुत्वाच्या या परंपरेला जपले आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की गांधींचा सत्य आणि अंहिसेचा संदेश विश्वात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जगाने २०३० पर्यंत  टी.बी. पूर्णपणे नष्ट करण्याचे ठरवले आहे. पण भारताने २०२५ मध्येच टी.बी. मुक्त करण्याचे उद्देश ठेवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Fri, 27 Sep 2019 07:49 PM IST

भारत हा शांतीप्रधान देश : मोदी

आम्ही युद्धाला नाही तर शांततेला महत्त्व देतो, असे सांगताना आम्ही युद्ध नाही तर बुद्ध दिला, असे मोदी यावेळी म्हणाले

Fri, 27 Sep 2019 07:46 PM IST

इतर राष्ट्रांसोबत बंधुत्व मजबूत करण्यावर भर दिला : मोदी

मागील पाच वर्षांत विश्व स्तरावर बंधुत्व मजबूत करण्याचे काम केले.

Fri, 27 Sep 2019 07:40 PM IST

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात होणार

मोदी आपल्या भाषणात कोण्यात्या मुद्यांवर भाष्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Modi UNGA :आम्ही 'युद्ध' नाही 'बुद्ध' दिले : पंतप्रधान