पुढील बातमी

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

 कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० च्या विभाजन प्रस्तावावर राज्यसभेत मतदान सुरु आहे. मतपत्रिकेद्वारे सर्व खासदारांचे मतदान घेण्यात येत आहे. ११ नव निर्वाचित खासदार वगळता अन्य खासदारांचे मतदान हे इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे घेण्यात येणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेत १२५-६१ अशा फरकाने कलम ३७० रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीत केंद्र सरकारने सोमवारी कलम ७० रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम ३७० रद्द केल्याची घोषणा केली. जम्मू काश्मीर संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल, गृहसचिव राजीव गौबा यांच्या उपस्थितीत तब्बल एक तास बैठक घेतली होती.  

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर