पुढील बातमी

Oscars 2020 द. कोरियाचा 'पॅरासाइट' ठरला सर्वोत्तम चित्रपट

Oscars 2020  द. कोरियाचा  'पॅरासाइट' ठरला सर्वोत्तम चित्रपट

चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'पॅरासाइट' या दक्षिण कोरियन चित्रपटानं सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. ऑस्कर पटकावलेला दक्षिण कोरियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटानं ऑस्करमध्ये सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम पटकथा आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचाही पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये सहा नामांकने मिळाले होती. 

 या पुरस्काराचे यंदाचे ९२वे वर्ष आहे. २०२० या वर्षांत कोणता अभिनेता- अभिनेत्री सर्वोत्तम कलाकाराच्या पुरस्कारवर नाव कोरणार? कोणता चित्रपट  सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरणार याकडे  संपूर्ण जगाचं लक्ष लागून होते.  ऑस्करमध्ये जोकीन फिनिक्सनं 'जोकर' चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेत्री  रेनी  झिलवेगरला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

ऑस्कर विजेत्यांची यादी 

सर्वोत्तम चित्रपट- पॅरासाइट
सर्वोत्तम अभिनेता-  जोकीन फिनिक्स (जोकर)
सर्वोत्तम अभिनेत्री- रेनी  झिलवेगर (जुडी)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता- ब्रॅ़ड पीट (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - लुरा डेर्न (मॅरेज स्टोरी)
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- पॅरासाइट 
सर्वोत्तम दिग्दर्शक- बाँग जून हो - पॅरासाइट
सर्वोत्तम मूळ पटकथा- पॅरासाइट 
सर्वोत्तम पटकथा (adapted) - जोजो रॅबिट
सर्वोत्तम माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी  
सर्वोत्तम अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म - टॉय स्टोरी ४ 
 सर्वोत्तम  वेशभूषा - लिटिल वुमन
 सर्वोत्तम  साऊंड एडिटिंग - फोर्ड वर्सेस फरारी
 सर्वोत्तम  साऊंड मिक्सिंग - १९१७
प्रोडक्शन डिझाइन- वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड
सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी- १९१७ 

Mon, 10 Feb 2020 10:05 AM IST

सर्वोत्तम चित्रपट - पॅरासाइट

द. कोरियाच्या पॅरासाइट चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे. 

Mon, 10 Feb 2020 09:47 AM IST

सर्वोत्तम अभिनेत्री- रेनी झिलवेगर (जुडी)

'जुडी'साठी अभिनेत्री रेनी  झिलवेगरला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार 

Mon, 10 Feb 2020 09:40 AM IST जोकर

सर्वोत्तम अभिनेता - जॉकिन फिनिक्स

'जोकर' चित्रपटातील अभिनयासाठी जॉकिन फिनिक्सला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार

Mon, 10 Feb 2020 09:27 AM IST बाँग जून हो

सर्वोत्तम दिग्दर्शक- बाँग जून हो

'पॅरासाइट' या चित्रपटासाठी बाँग जून होला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. 

Mon, 10 Feb 2020 08:58 AM IST पॅरासाइट

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म - पॅरासाइट

ऑस्करमध्ये नामांकन मिळालेला आणि हा पुरस्कार जिंकलेला दक्षिण कोरियाचा पहिला चित्रपट  

Mon, 10 Feb 2020 08:37 AM IST सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी- १९१७

सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी- १९१७

१९१७ या चित्रपटानं सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफीसाठी ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 

Mon, 10 Feb 2020 08:07 AM IST सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री

सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - लुरा डेर्न

'मॅरेज स्टोरी'साठी लुरा डेर्ननं पटकावला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर 

Mon, 10 Feb 2020 07:43 AM IST

सर्वोत्तम माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी

'अमेरिकन फॅक्टरी'ला मिळाला सर्वोत्तम माहितीपटाचा ऑस्कर 

Mon, 10 Feb 2020 07:30 AM IST

अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म- टॉय स्टोरी ४

'टॉय स्टोरी ४' ला सर्वोत्तम 'अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म'चा ऑस्कर पुरस्कार तर 'हेअर लव्ह'नं जिंकला अ‍ॅनिमेटेड लघुपटाचा पुरस्कार 

Mon, 10 Feb 2020 07:23 AM IST

सर्वोत्तम मूळ पटकथा- पॅरासाइड

दक्षिण कोरियाचा चित्रपट 'पॅरासाइड'नं जिंकला सर्वोत्तम मूळ पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार

Mon, 10 Feb 2020 07:19 AM IST

ब्रॅड पिट ठरला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता

'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड'साठी ब्रॅड पिट सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Oscars 2020 द. कोरियाचा 'पॅरासाइट' ठरला सर्वोत्तम चित्रपट