पुढील बातमी

NZ vs IND: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट

NZ vs IND: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट

चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पुन्हा एकदा पराभूत केले. प्रथम फंलदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. शार्दुलने अखेरच्या षटकात केवळ ६ धावा खर्च करुन न्यूझीलंडला १६५ धावांत रोखले. सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये निकाल लागलेला मालिकेतील हा सलग दुसरा सामना ठरला.  अखेरच्या षटकात ७ धावा आवश्यकता असताना न्यूझीलंडने ४ गडी गमावले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये गेला. न्यूझीलंडने सेफर्टची विकेट गमावत बुमराहच्या षटकात १३ धावा करत भारतासमोर १४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने लोकेश राहुलने तीन चेंडूत केलेल्या १० धावा आणि विराटने तीन चेंडूत नाबाद ६ धावांच्या खेळीच्या जोरावर चौथा सामनाही खिशात घातला.   

भारतीय संघाने दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टिल अवघ्या चार धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर कॉलीन मुन्रो (६४) आणि टिम सेफर्टने (५७) धावांची दमदार खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. विराट कोहलीने मुन्रोला धावबाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. ही विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली. मुन्रो बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या टॉम ब्रूसला चहलने आल्या पावली माघारी धाडत न्यूझीलंडला तिसरा झटका दिला. त्यानंतर सेफर्ट-टेलरने न्यूझीलंडच्या विजयाची आस कायम ठेवली. मात्र रॉस टेलर २४ धावा करुन माघारी फिरल्यानंतर सेफर्ट धावबाद झाल्यामुळे सामना पुन्हा भारताच्या बाजूने फिरला. तळाचे फलंदाज एकामागोमाग बाद झाल्यामुळे न्यूझीलंडला अखेरच्या षटकात ७ धावा काढता आल्या नाहीत.     

...म्हणून क्रिकेट चाहते विराटवर भडकले

या सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी  निराशजनक कामगिरी केली. पण मोक्याच्या क्षणी मनिष पांडेने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावार टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ८ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली आहे.  रोहित शर्माच्या अनुपस्थितीत प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल आणि संजू सॅमसन या जोडीने भारताच्या डावाला सुरुवात केली. संजू सॅमसन मिळालेल्या संधीच सोन करण्यात अपयशी ठरला. तो अवघ्या ८ धावा करुन माघारी फिरला. कर्णधार विराट कोहलीही ११ धावांची भर घालून चालता झाला.

रोहित जैसा 'विसराळू' कोई नहीं!

त्यानंतर सलामीवर लोकेश राहुलच्या खेळीला सोधीनं ३९ धावांवर थांबवली.  फार्मात असणारा युवा फलंदाज श्रेयस अय्यर या सामन्यात केवळ १ धावा करुन बाद झाला. शिवम दुबे १२ धावा करुन परतल्यानंतर मनिष पांडेनं शार्दुल ठाकरुच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला. शार्दुलने १५ चेंडूत २० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला चहल अवघ्या एका धावेची भर घालू शकला. मनिष पांडे नाबाद ५० आणि नवदीप सैनीच्या नाबाद ११ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकात ८ बाद १६५ मजल मारली होती.

Fri, 31 Jan 2020 04:42 PM IST

कोहलीनं चौकार खेचत दुसरा सुपर मुकाबलाही भारताच्या नावे केला

भारतीय संघाने सुपर ओव्हमध्ये गेलेला सामना जिंकत मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली.

Fri, 31 Jan 2020 04:41 PM IST

लोकेश राहुल दोन चेंडूत दहा धावा करुन माघारी

लोकेश राहुलने पहिल्या दोन चेंडूतच सामना भारताच्या बाजूने फिरवला. 

 

Fri, 31 Jan 2020 04:35 PM IST

भारतासमोर १४ धावांचे लक्ष्य

न्यूझीलंडने सेफर्टची विकेट गमावत बुमराहच्या षटकात १३ धावा केल्या असून भारतासमोर १४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Fri, 31 Jan 2020 04:29 PM IST

सुपर ओव्हर!

भारताकडून बुमराह तर न्यूझीलंडकडून सेफर्ट आणि मुन्रोने केली सुरुवात 

Fri, 31 Jan 2020 04:18 PM IST

अखेरच्या चेंडूवर सँटनर धावबाद, सामन्याचा निकाल पुन्हा सुपर ओव्हरमध्ये

तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर सलग दुसरा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये होणार आहे. अखेरच्या षटकात ७ धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडने गमावल्या चार विकेट्स

Fri, 31 Jan 2020 04:17 PM IST

मिचेलच्या रुपात न्यूझीलंडला सहावा धक्का!

अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरला आणखी एक यश

Fri, 31 Jan 2020 04:14 PM IST

सेट सेफर्ट धावबाद, न्यूझीलंडला पाचवा धक्का!

अर्धशतकी खेळी करुन न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सेफर्ट बाद झाला.

Fri, 31 Jan 2020 04:12 PM IST

रॉस टेलरच्या रुपात न्यूझीलंडला चौथा धक्का!

डावातील अखेरचे षटक घेऊन आलेल्या शार्दुल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग फटका टोलवण्याच्या नादात रॉस टेलरने गमावली विकेट, त्याने २४ धावांची खेळी केली. 

Fri, 31 Jan 2020 03:30 PM IST

चहलने टॉम ब्रूसला आल्यापावली माघारी धाडले, न्यूझीलंडला तिसरा धक्का

टॉम ब्रूस चहलच्या जाळ्यात, त्याला खातेही उघडता आले नाही. 

Fri, 31 Jan 2020 03:29 PM IST

मुन्रोचा खेळ खल्लास! शार्दुल-विराटने धाडले माघारी

क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नजराणा दाखवून देत विराट कोहली-शार्दूल ठाकूरने मुन्रो-सेफर्ट जोडी फोडली. शार्दुलने सीमारेषेवरुन विराटकडे चेंडू टाकला अन् विराटने यष्टिचा वेध घेत मुन्रोला तंबूत धाडले. मुन्रोने ६४ धावांची खेळी केली. 

Fri, 31 Jan 2020 03:03 PM IST

न्यूझीलंडला पहिला धक्का, सलामीवीर गप्टिल माघारी

जसप्रित बुमराहने लोकेश राहुलकरवी गप्टिलला अवघ्या चार धावांवर झेलबाद केले. 

Fri, 31 Jan 2020 02:16 PM IST

न्यूझीलंडला १६६ धावांचे आव्हान

अखेरच्या टप्प्यात मनीष पांडे आणि शार्दुल ठाकूरच्या प्रभावी फलंदाजीने टीम इंडियाला निर्धारित २० षटकांत १६५ धावांपर्यंत मजल मारली. मनीष पांडेने नाबाद अर्धशतक केले. ९ सामन्यात प्रथमच फंलदाजी करणाऱ्या नवदीप सैनीनेही त्याला चांगली साथ दिली. 

Fri, 31 Jan 2020 02:06 PM IST

टीम इंडियाचे ८ गडी बाद

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. १६ षटकांच्या आतच संघाचे ८ फलंदाज तंबूत परतले होते. परंतु, मनीष पांडेने शार्दुल ठाकूरच्या साथीने टीमला सावरले. टीम इंडियाने १९ षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या आहेत. मनीष पांडे आणि नवदीप सैनी खेळपट्टीवर आहेत.

Fri, 31 Jan 2020 01:38 PM IST

न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचा प्रभावी मारा, टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत

सेंटनर आणि ईश सोधीच्या प्रभावी फिरकीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण टाकले आहे. शिवम दुबे आणि सामन्यात संधी मिळालेला वॉशिंग्टन सुंदरला आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यांनी तंबूचा रस्ता लवकर पकडला. टीम इंडियाने १३.३ षटकांत ६ बाद १०१ धावा केल्या आहेत. मनीष दुबे आणि शार्दुल ठाकूर खेळपट्टीवर आहेत.

Fri, 31 Jan 2020 01:23 PM IST

३९ धावांवर केएल राहुल बाद

जबरदस्त फॉर्मात असलेला केएल राहुल अखेर न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधीच्या जाळ्यात अडकला. डीप मिडविकेटला उंच उडालेला झेल सँटनरने टिपला. राहुलने २६ चेंडूत ३९ धावा केल्या. टीम इंडियाने ९.३ षटकात ४ बाद ८० धावा केल्या आहेत. मनीष पांडे ४ तर शिवम दुबे १२ धावांवर खेळत आहे.

Fri, 31 Jan 2020 01:18 PM IST

श्रेयस आल्यापावली परत

कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला श्रेयस अय्यर आपली चमक दाखवू शकला नाही. पहिल्या तीन सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अय्यरला ईश सोधीने स्वस्तात बाद केले. विकेटकिपर सेफर्टने चपळाई दाखवत त्याचा झेल टिपला. अय्यरला अवघी १ धाव करता आली.टीम इंडियाने ८.२ षटकात ७४ धावा केल्या आहेत.राहुल ३९ तर दुबे १० धावांवर खेळत आहे.

Fri, 31 Jan 2020 01:00 PM IST

सँटनरने टिपला अप्रतिम झेल

न्यूझीलंडला मोठे यश मिळाले. फॉर्मात असलेल्या कर्णधार विराट कोहलीला हॅमिश बेनेटने बाद केले. मिशल सँटनरने त्याचा अप्रतिम झेल टिपला.विराटला ९ चेंडूत ११ धावा करता आल्या. टीम इंडियाच्या ५ षटकांत २ बाद ५० धावा झाल्या आहेत. 

Fri, 31 Jan 2020 12:53 PM IST

सॅमसनने संधी गमावली

सलामीवीर रोहित शर्माच्या जागेवर संघात समावेश करण्यात आलेल्या संजू सॅमसनला संधीचे सोनं करता आला नाही. षटकार मारुन स्कॉट कुगेलेइनचा स्वागत करणारा सॅमसन त्याच षटकात बाद झाला. त्याला केवळ ८ धावाच करता आल्या. उंचावून मारण्याच्या प्रयत्नात उडालेला झेल मिशेल सँटनरने टिपला. टीम इंडियाच्या ३.४ षटकांत १ बाद ३९ धावा झाल्या आहेत. केएल राहूल (२४) आणि कर्णधार विराट कोहली (३) खेळपट्टीवर आहेत

Fri, 31 Jan 2020 12:33 PM IST

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन जायबंदी

किवी कर्णधार विल्यम्सन खांद्याला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून बाहेर झाला आहे. कॉलिन डि ग्रँडहोमऐवजी टॉम ब्रूसला संधी देण्यात आली आहे. विल्यम्सनच्या जागी डेरेल मिशेलला संघात घेतले आहे.

Fri, 31 Jan 2020 12:30 PM IST

रोहित, जडेजा आणि शमीला विश्रांती

टीम इंडियात तीन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्याजागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, वॉश्गिंटन सुंदर आणि नवदीप सैनीचा संघात समावेश

Fri, 31 Jan 2020 12:27 PM IST

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NZ vs IND: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट