पुढील बातमी

NZvs IND ODI: किवींनी जीव काढला, सामन्यासह मालिका जिंकली

NZvs IND ODI: किवींनी जीव काढला, सामन्यासह मालिका जिंकली

आघाडीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह भारताने मालिका गमावली आहे. ऑकलंडच्या मैदानात न्यूझीलंडने भारताला २२ धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.मयांक (३), पृथ्वी शॉ (२४) विराट कोहली (२४) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मध्यफळीतील युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. तो ५२ धावांवर माघारी फिरल्यानंतर मैदानात उतरलेला केदार जाधव फारशी कमाल दाखवू शकला नाही. रविंद्र जडेजा (५५) आणि नवदिप सैनी (४५) धावा करत सामन्यात विजयाची आस निर्माण केली. पण सैनी बाद झाल्यानंतर जडेजाला फिनिशिंग टच देण्यात अपयश आले. भारतीय संघ ४८. ३ षटकात २५१ धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून बॅनेट, साऊथी, जेमिनसन, कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी दोन तर जेम्स निशीमने एक बळी टिपला

NZvsIND: कोहलीच्या या निर्णयावर भज्जीही संतापला

रॉस टेलर आणि काइल जेमीसन यांनी अखेरच्या षटकात केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियासमोर २७४ धावांचे आव्हान ठेवले आहे.  सलामीवीर मार्टिन गुप्टिल (७९) आणि हेन्री निकोलस (४१) धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र ही जोडी परतल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. टॉम ब्लुण्डेंल २२ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

NZvsIND: कोहलीच्या या निर्णयावर भज्जीही संतापला

एका बाजूने विकेट पडत असताना रॉस टेलरने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले. त्याने काइल जेमीसनसोबत ५१ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. टेलरने नाबाद ७३ धावा केल्या तर जेमीसनने २४ चेंडूत २५ धावांची खेळी केली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकात ८ बाद २७३ धावांपर्यंत मजल मारली होती. 

NZvsIND: ६ फूट ८ इंच उंचीचा काइल जेमीसन भारताविरोधात करणार पदार्पण

भारताकडून चहलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरला दोन तर जडेजाला एक विकेट मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. टी-२० मालिका दिमाखदार तोऱ्यात जिंकणाऱ्या टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विराट सेना हे आव्हान पेलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

 

Sat, 08 Feb 2020 03:54 PM IST

रविंद्र जडेजाच्या विकेट्सह भारताने सामन्यासह मालिका गमावली

रविंद्र जडेजाने ५५ धावा करत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो  संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

Sat, 08 Feb 2020 03:31 PM IST

चहलच्या रुपात टीम इंडियाला नववा धक्का!

दुहेरी धाव घेताना चहलने गमावली विकेट

Sat, 08 Feb 2020 03:23 PM IST

रविंद्र जडेजाचे अर्धशतक!

मोक्याच्या क्षणी रविंद्र जडेजाची मोलाची खेळी, अर्धशतकाने भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. 

Sat, 08 Feb 2020 03:13 PM IST

सैनीच्या रुपात भारताला मोठा धक्का!

नवदीप सैनीने ४९ चेंडूत ४५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.  

Sat, 08 Feb 2020 02:23 PM IST

शार्दुल ठाकूरच्या रुपात भारताला सातवा धक्का!

डी ग्रँडहोमने शार्दुलला १५ धावांवर बोल्ड केले. 

Sat, 08 Feb 2020 01:52 PM IST

अर्धशतकानंतर अय्यर माघारी, भारताला सहावा धक्का

बॅनेटच्या षटकात श्रेयस अय्यरने गमावली विकेट, अय्यरने ५७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली.   

Sat, 08 Feb 2020 01:26 PM IST

भारताचा अर्धा संघ माघारी!

टिम साऊदीने मध्यफळीतील फलंदाज केदार जाधवला अवघ्या ९ धावांवर माघारी धाडले. 

Sat, 08 Feb 2020 12:49 PM IST

भारताला चौथा धक्का, ग्रँडहोमने लोकेश राहुलला धाडले माघारी!

लोकेश राहुल अवघ्या चार धावा करुन माघारी फिरला असून भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी ही श्रेयस अय्यर आणि केदार जाधव यांच्यावर आहे. 

Sat, 08 Feb 2020 12:44 PM IST

साऊदीनं विराटला केलं बोल्ड!

टिम साऊदीनं कर्णधार विराट कोहलीला अवघ्या १५ धावांवर बोल्ड केले

Sat, 08 Feb 2020 12:43 PM IST

पृथ्वी शॉच्या रुपात भारताला दुसरा धक्का!

पृथ्वी शॉनं १९ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २४ धावा केल्या. जेमिसनने त्याच्या रुपात वनडे कारकिर्दीतील आपली पहिली विकेट घेतली.

Sat, 08 Feb 2020 11:59 AM IST मयांक अग्रवाल

मयांकच्या रुपात भारताला पहिला धक्का!

बॅनेटने मयांक अग्रवालला रॉस टेलरकरवी झेलबाद केले.  

Sat, 08 Feb 2020 11:52 AM IST

बॅनेटच्या पहिल्या षटकात पृथ्वीनं लगावले ३ चौकार!

सलामीवीर पृथ्वी शॉने पहिल्या षटकात ३ चौकार खेचत भारताला दमदार सुरुवात करुन दिली.

Sat, 08 Feb 2020 11:38 AM IST

न्यूझीलंड निर्धारित ५० षटकात ८ बाद २७३ धावा

रॉस टेलर आणि काइल जेमीसन यांनी अखेरच्या षटकात ७६ धावांची दमदार भागीदारी केल्यामुळे न्यूझीलंड संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश

Sat, 08 Feb 2020 10:41 AM IST

चहलला तिसरे यश, न्यूझीलंडचा आठवा गडी माघारी

टीम साऊदीच्या रुपात युजवेंद्र चहलने न्यूझीलंडला दिला आठवा धक्का, चहलचे हे तिसरे यश आहे.

Sat, 08 Feb 2020 10:40 AM IST

चहलने मार्कच्या रुपात न्यूझीलंडला दिला सातवा धक्का!

 युजवेंद्र चहने स्वत:च्या गोंलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत मार्कला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले.

Sat, 08 Feb 2020 10:27 AM IST

कॉलिन डी ग्रँडहोमही माघारी, किवींना सहावा धक्का!

कॉलिन डी ग्रँडहोमच्या रुपात न्यूझीलंडला सहावा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला

Sat, 08 Feb 2020 10:23 AM IST

न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत

रविंद्र जडेजाने जेम्स निशीमला ३ धावांवर धावबाद केले.

Sat, 08 Feb 2020 09:56 AM IST

लॅथमला जडेजाने धाडले माघारी, न्यूझीलंडचा चौथा गडी तंबूत

रविचंद्र जडेजाने न्यूझीलंडचा कर्णधार आणि यष्टिरक्षक टॉम लॅथम अवघ्या ७ धावांवर तंबूत धाडले.

Sat, 08 Feb 2020 09:55 AM IST

न्यूझीलंडला तिसरा धक्का! गप्टिल माघारी

सलामीवीर मार्टिन गप्टिल ७९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करुन धावबाद

Sat, 08 Feb 2020 09:30 AM IST

न्यूझीलंडला दुसरा धक्का!

शार्दुल ठाकूरने टॉम ब्लूण्डेंलला अवघ्या २२ धावांवर माघारी धाडले 

Sat, 08 Feb 2020 08:59 AM IST

चहलने भारताला मिळवून दिले पहिले यश!

शतकी भागीदारीकडे कूच करणाऱ्या न्यूझीलंडची सलामी जोडी फोडण्यात टीम इंडियाला यश आले आहे. युजवेंद्र चहलने हेन्रीला ४१ धावांवर बाद केले.

Sat, 08 Feb 2020 08:56 AM IST

न्यूझीलंड संघाचे अर्धशतक!

न्यूझीलंडच्या सलामी जो़डीने कोणतीही पडझड होऊ न देता संघाच्या धावफलक पन्नाशी पार नेला.

Sat, 08 Feb 2020 08:11 AM IST

हेन्री-गप्टिल जोडीची दमदार सुरुवात

हेन्री आणि गप्टिल या न्यूझीलंडच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवा करुन दिली आहे. 

Sat, 08 Feb 2020 08:10 AM IST

भारताने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय!

भारतीय  कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NZvs IND ODI: किवींनी जीव काढला, सामन्यासह मालिका जिंकली