पुढील बातमी

गोड बातमी कधीही येऊ शकते - सुधीर मुनगंटीवार

गोड बातमी कधीही येऊ शकते - सुधीर मुनगंटीवार

राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. तरी सुध्दा सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेला वाद अद्याप काही मिटलेला नाही. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा सुरुच आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

Wed, 06 Nov 2019 04:16 PM IST

गोड बातमी कधीही येऊ शकते - सुधीर मुनगंटीवार

ओला दुष्काळासंदर्भातील आढावा बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. 'कितीही प्रयत्न केले तरीही आपण पाणी वेगळे करू शकत नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत. आज शेतकरी प्रश्नांवर आमची चांगली चर्चा झाली. आपण बातमीची वाट पाहिली पाहिजे. गोड बातमी कधीही येऊ शकते. 

Wed, 06 Nov 2019 03:58 PM IST

शिवसेना आमदारांची उद्या मातोश्रीवर होणार बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. 

Wed, 06 Nov 2019 03:34 PM IST

कुठल्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री नको - हुसेन दलवाई

महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये. तसंच कुठल्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री नको, असे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधींनी निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Wed, 06 Nov 2019 03:08 PM IST

हुसेन दलवाई सामना कार्यालयात दाखल

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांना वेग आला आहे. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई सामना कार्यालयात दाखल झाले आहेत. 

Wed, 06 Nov 2019 01:26 PM IST

उध्दव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नये - रामदास आठवले

राज्यातील सत्ता स्थापनेच्या वादावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं आडमुठेपणाची भूमिका सोडावी. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद पदरात घ्यावे. उध्दव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. भविष्यात उध्दव ठाकरेही मुख्यमंत्री चालतील. भाजपसोबत युती तोडणं आत्मघात ठरेल, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला देताना दिली. 

Wed, 06 Nov 2019 12:58 PM IST

राष्ट्रपती राजवटीची फक्त शिवसेनेला भिती - शरद पवार

युतीत सडले तरी एकत्र लढले, असल्याची शरद पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राष्ट्रपती राजवटीची फक्त शिवसेनेला भिती असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. 

Wed, 06 Nov 2019 12:55 PM IST

आमच्याकडे संख्याबळ असते तर सरकार बनवले असते - पवार

आमच्याकडे संख्याबळ असते तर सरकार बनवले असते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस १०० च्या पुढे जात नाही, असे पवारांनी यावेळी सांगितले. 

Wed, 06 Nov 2019 12:52 PM IST

काँग्रेस- राष्ट्रवादीत एकत्रित निर्णय व्हावा - शरद पवार

काँग्रेसने काय निर्णय घेतला याबाबत काहीच माहिती नाही. काँग्रेस आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीत एकत्रित निर्णय व्हावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. 

Wed, 06 Nov 2019 12:51 PM IST

शिवसेना- भाजपने मिळून सरकार बनवावं - शरद पवार

शिवसेना भाजपची २५ वर्षाची युती आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपने मिळून सरकार बनवावं, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.  

Wed, 06 Nov 2019 12:49 PM IST

दिल्लीतील आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार - शरद पवार

दिल्लीतील पोलिसांच्या आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया दिली आहे. देशाची सेवा करणारे लोकं संकटात आहेत. देशातील सर्व राज्यात पोलिसांची अवस्था गंभीर आहे. १४ ते १८ तास पोलिसांना ड्युटी  करावी लागते. त्यांना आठड्याची सुट्टी मिळत नाही. दिल्लीतील वकिलांनी सबुरीनं घ्याव. दिल्लीतील आंदोलनाला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही, असे पवारांनी यावेळी सांगितले. 

Wed, 06 Nov 2019 12:46 PM IST

संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आले नव्हते - शरद पवार

संजय राऊत यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्यसभेच्या अधिवेशनाबाबत संजय राऊतांसोबत चर्चा झाली असल्याचे पवारांनी सांगितले. 

Wed, 06 Nov 2019 12:44 PM IST

पीक विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढा - शरद पवार

वीमा कंपन्यांची बैठक घेऊन चर्चा करा. वीमा कंपन्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढा - शरद पवार 

Wed, 06 Nov 2019 12:43 PM IST

अयोध्या प्रकरणातील निकालानंतर शांतता राखावी - पवार

अयोध्या प्रकरणातील निकालानंतर शांतता राखावी. आयोध्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. 

Wed, 06 Nov 2019 12:42 PM IST

आम्ही जबाबदारविरोधी पक्षनेते म्हणून काम करु - शरद पवार 

भाजप-शिवसेनाला जनतेने कौल दिला आहे. आम्ही जबाबदारविरोधी पक्षनेते म्हणून काम करु - शरद पवार 

Wed, 06 Nov 2019 12:40 PM IST

पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे - शरद पवार

अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. नवीन पीक घेण्यासाठी कर्जपुरवठा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने मदत करावी. 
शेतकरी संकटात असताना पीकविमा कंपनी आपली जबाबदारी पार पाडत नसले तर या सर्व वीमा कंपन्यांना केंद्राने आवश्यक सूचना द्याव्यात. तसंच पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 
 

Wed, 06 Nov 2019 12:18 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा नाही - अहमद पटेल

अहमद पटेल आणि नितीन गडकरी यांची भेट संपली. मात्र या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील राजकारणाबाबत काहीच चर्चा झाली नाही. तर शेतकरी आणि रस्त्याच्या कामासंदर्भात भेटीत चर्चा झाली असल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.  

Wed, 06 Nov 2019 12:05 PM IST

शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे - यशोमती ठाकूर

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप कठिण आहे. शरद पवारांची भेट घेऊन ओला दुष्काळ परिस्थितीवर चर्चा केली. मताधिक्य मिळून देखील शिवसेना- भाजप सरकार स्थापन करु शकत नाही. त्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.  

Wed, 06 Nov 2019 12:01 PM IST

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आढावा बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला फक्त भाजप, घटक पक्षातील १८ मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना बैठकीचे अधिकृत निमंत्रण गेले नाही. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळ आढाव्यावर चर्चा सुरु आहे. 

Wed, 06 Nov 2019 11:48 AM IST

अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

सत्ता स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी गडकरींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Wed, 06 Nov 2019 11:43 AM IST

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  

Wed, 06 Nov 2019 11:40 AM IST

यशोमती ठाकूर यांनी घेतली पवारांची भेेट

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बुधवारी सकाळी शरद पवारांची भेट घेतली. दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेऊन शरद पवार मुंबईत परतले त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. 

Wed, 06 Nov 2019 11:37 AM IST

ही सदिच्छा भेट - शरद पवार

संजय राऊत आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १० मिनिटं चर्चा झाली. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Wed, 06 Nov 2019 11:35 AM IST

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:गोड बातमी कधीही येऊ शकते - सुधीर मुनगंटीवार