पुढील बातमी

NCPचे आमदार मुंबईतील हॉटेल रेनेसान्समध्ये

NCPचे आमदार मुंबईतील हॉटेल रेनेसान्समध्ये

राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असताना अचानक महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण आले आहे. मुंबईतल्या राजभवनामध्ये सर्वात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यामध्ये भाजपच राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर गटाचे नवे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनावर राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. अचानक झालेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

'चोरी-चोरी चुपके चुपके स्थापन झालेले सरकार टिकणार नाही'

सकाळच्या दिवशी भाजपच्या गोटात दिसलेला उत्साह संध्याकाळी पुन्हा राष्ट्रवादीच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांची तातडीने बैठक बोलवली. या बैठकीला अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदारांनी पवारांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी केली. एवढेच नाही तर शिवसेना-काँग्रेसने सत्तास्थापनेच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भातील सुनावणीनंतर राजकारणाचे वारे कुणाच्या बाजूने वाहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Sat, 23 Nov 2019 10:22 PM IST

NCP चे आमदार हॉटेल रेनेसान्सकडे रवाना

वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीची बैठक संपली. बैठकीनंतर राष्ट्रावादीचे आमदार बसमधून हॉटेल रेनेसान्सकडे  रवाना झाले.

Sat, 23 Nov 2019 09:40 PM IST

भाजपच्या सत्तास्थापनेसंदर्भातील याचिकेवर उद्या सुनावणी

भाजपविरोधात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी ११ वाजून ३० मिनिटांनी सुनावणी होणार आहे. सत्तास्थापनेसंदर्भात आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.   

Sat, 23 Nov 2019 08:55 PM IST

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गटनेतेपदाचे सर्व अधिका बहाल करण्यात आले आहेत.

Sat, 23 Nov 2019 07:59 PM IST

जवळपास ५० आमदार वाय.बी. सेंटरमध्ये

अजित पवार यांच्यासोबत असणारे अनेक आमदार वाय.बी. सेंटमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना याठिकाणी आणल्याचे पाहायला मिळाले. संजय बनसोडे यांनी पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.   

Sat, 23 Nov 2019 06:51 PM IST

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीच्या प्रक्रियेच्या संदर्भात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.   

Sat, 23 Nov 2019 05:26 PM IST

आम्ही सर्व एकत्र आहोत : राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके

आम्ही शरद पवारांसोबत आहोत, असे म्हणत सर्व ठीक होईल, असा विश्वास वायबी सेंटरमध्ये बैठकीसाठी दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला आहे.  

Sat, 23 Nov 2019 05:03 PM IST

अजित पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या बैठकीला निघाले

अजित पवारांशी चर्चा करुन सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या बैठकीला रवाना

Sat, 23 Nov 2019 03:55 PM IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे-पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी ब्राइटन येथे दाखल झाले आहेत. 

Sat, 23 Nov 2019 03:31 PM IST

बाळासाहेबांचे प्रामाणिक राजकारण शिवसेना विसरली - रविशंकर प्रसाद

स्वार्थासाठी शिवसेनेने युती तोडली आहे. बाळासाहेबांचे प्रामाणिक राजकारण शिवसेना विसरली असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. नवीन युती राज्यात स्थिर सरकार देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Sat, 23 Nov 2019 02:50 PM IST

अजित पवारांना जनता कधीच माफ करणार नाही - राऊत

अजित पवारांना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही. ब्लॅकमेल केल्याशिवाय अजित पवारांसारखा नेता कुटुंब आणि घर सोडून जाणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. भाजपच्या अंताची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातून झाली. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना नैतिकतेचे हे धडे दिलेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 
 

Sat, 23 Nov 2019 02:48 PM IST

फसवून नेलेले आमदार परत आले आहेत - राऊत

फसवून नेलेले आमदार परत आले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तिन्ही पक्षाचे आमदार फुटणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले आहे. 


 

Sat, 23 Nov 2019 02:21 PM IST

काँग्रेसला आमदार फुटण्याची भिती

काँग्रेसला आमदार फुटण्याची भिती आहे त्यामुळे ते काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला हलवणार आहेत. 

Sat, 23 Nov 2019 01:50 PM IST

काँग्रेसकडून शपथविधीचा निषेध

काँग्रेसकडून सत्तास्थापनेसाठी कोणताही उशीर झालेला नाही. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्याने हा पेच पाहायला मिळाला. राज्यघटनेचा अपमान करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा झाला, असे काँग्रेस नेते अहमद पटेल, यांनी म्हटले आहे. 

Sat, 23 Nov 2019 01:15 PM IST

फाटाफूटीतून मी गेलो आहे - शरद पवार

अजित पवार फुटून जातील असे वाटले नव्हते. अशा फाटाफूटीतून मी गेलो आहे असे शरद पवारांनी सांगितले. दरम्यान, पक्षाची बैठक घेऊन अजित पवारांविरोधात कारवाईचा निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले. तसंच ईडीच्या चौकशामुळे अजित पवार गेले असतील तर मला माहिती नाही असे सांगत कुठलंही संकट आले तरी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Sat, 23 Nov 2019 01:09 PM IST

मर्द मावळे रणांगणावर असतात. रात्रीस खेळ चाले करुन सत्ता मिळवत नाही - ठाकरे

मर्द मावळे रणांगणावर असतात. रात्रीस खेळ चाले करुन सत्ता मिळवत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.                 

Sat, 23 Nov 2019 01:09 PM IST

मर्द मावळे रणांगणावर असतात. रात्रीस खेळ चाले करुन सत्ता मिळवत नाही -

मर्द मावळे रणांगणावर असतात. रात्रीस खेळ चाले करुन सत्ता मिळवत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.                 

Sat, 23 Nov 2019 01:05 PM IST

'मी' पणा विरु्दध ही लढाई सुरु झाली- उद्धव ठाकरे

'मी' पणा विरु्दध ही लढाई सुरु झाली आहे. लोकशाहीच्या नावाने रात्रीस खेळ चालू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  

Sat, 23 Nov 2019 01:02 PM IST

भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही - शरद पवार

भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही. त्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र येत आम्ही सरकार स्थापन करु असे शरद पवार यांनी सांगितले. आम्ही एकत्र आहे आणि राहणार असे देखील ते म्हणाले. 

Sat, 23 Nov 2019 01:01 PM IST

५४ जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक - शरद पवार

यादी तयार करुन आमदारांच्या सह्या करुन ठेवल्या होत्या. ज्या याद्या राज्यपालांना सादर केल्या त्या याद्या अजित पवारांनी कार्यालयातून ताब्यात घेतल्या. ५४ जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली गेली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 
 

Sat, 23 Nov 2019 12:53 PM IST

 १० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत - शरद पवार

महाराष्ट्राची भावना भाजपसोबत जाण्याविरोधात आहे. जे सदस्य अजित पवारांसोबत गेले त्यांना आधीच माहिती होते. १० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत आहेत. सर्वसामान्य माणूस शरद पवार यांच्याविरोधात नाही. जे सदस्य अजित पवारांसोबत गेले ते परत येतायत, असे शरद पवार यांनी सांगितले. 
 

Sat, 23 Nov 2019 12:52 PM IST

अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात

अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात आहे. जे सदस्य अजित पवारांसोबत जाणार आहेत आणि गेले असतील त्यांच्याविरोधात पक्षांतराची कारवाई करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. 

Sat, 23 Nov 2019 12:13 PM IST

वायबी सेंटरबाहेर अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

वायबी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

Sat, 23 Nov 2019 12:12 PM IST

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वायबी सेंटरवर दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरवर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवेसना यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.  

Sat, 23 Nov 2019 12:08 PM IST

अजित पवारांची विधीमंडळ पक्षेनेतेपदावरुन हकालपट्टी

अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची विधीमंडळ पक्षेनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. 

Sat, 23 Nov 2019 11:58 AM IST

शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल वायबी सेंटरमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जन खर्गे, अहमद पटेल वाय बी चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. याठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. 

Sat, 23 Nov 2019 11:48 AM IST

भाजपच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक

भाजपच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीला भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजपला ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Sat, 23 Nov 2019 10:36 AM IST

काँग्रेसने बोलावली तातडीची बैठक

काँग्रेसने सर्व नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.  

Sat, 23 Nov 2019 10:32 AM IST

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बोलावली बैठक

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. सायंकाळी साडेचार वाजता वायबी सेंटर येथे ही बैठक होणार आहे. 

Sat, 23 Nov 2019 10:30 AM IST

अमित शहांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांंनी ट्विट करत राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.

 

Sat, 23 Nov 2019 10:28 AM IST

अजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही - शरद पवार

अजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

Sat, 23 Nov 2019 10:26 AM IST

उद्धव ठाकरे आणि शरद पवार घेणार पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

 

Sat, 23 Nov 2019 10:24 AM IST

३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी मुदत

राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाने सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी मुदत दिली आहे. 

Sat, 23 Nov 2019 10:22 AM IST

नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला.  

Sat, 23 Nov 2019 10:21 AM IST

अजित पवार यांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपला - राऊत

अजित पवार यांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपला आहे. तसंच त्यांनी शरद पवारांना दगा दिला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.  

Sat, 23 Nov 2019 10:20 AM IST

संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली - चंद्रकांत पाटील

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची आणि महाराष्ट्राची वाट लावली असल्याची टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच, संजय राऊत आता तरी गप्प बसा असे त्यांनी सांगितले आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NCPचे आमदार मुंबईतील हॉटेल रेनेसान्समध्ये