पुढील बातमी

'चर्चा अजून संपलेली नाही, शनिवारीही सुरु राहणार'

'चर्चा अजून संपलेली नाही, शनिवारीही सुरु राहणार'

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. त्यानंतर आज मुंबईमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सहमती झाल्याचे सांगितले. तसेच शनिवारी यावर निर्णायक पाऊल उचलले जाईल असेही ते म्हणाले.

Fri, 22 Nov 2019 07:58 PM IST

'चर्चा अजून संपलेली नाही, उद्या पुन्हा सुरु राहणार'

चर्चा अजून संपलेली नसून उद्या ती पुन्हा सुरु राहणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. अनेक मुद्द्यांवर आमची सहमती झाली आहे. सर्व गोष्टी सकारात्मक झाल्या आहेत. सर्व बाबी उद्याच स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले.

Fri, 22 Nov 2019 07:48 PM IST

चर्चा योग्य दिशेने आणि चांगली झालीः उद्धव ठाकरे

बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चर्चा सकारात्मक आणि योग्य दिशेने झाल्याचे सांगितले. सर्व विषय सोडवल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर येणार असून यावर शनिवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Fri, 22 Nov 2019 06:59 PM IST

उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमतीः शरद पवार

बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सहमती झाली असून त्यावर दुमत नसल्याचे स्पष्ट केले.

Fri, 22 Nov 2019 04:52 PM IST

उद्धव ठाकरे नेहरु सेंटरमध्ये दाखल

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्याह नेहरु सेंटर येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित. या बैठकीला काँग्रेसचे नेते अहमद पटेल. मल्लिकार्जून खर्गे, शरद पवार, संजय राऊत आदि नेते उपस्थित आहेत.

Fri, 22 Nov 2019 04:30 PM IST

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही - गडकरी

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही असे गडकरी यांनी सांगितले आहे.

 

Fri, 22 Nov 2019 01:17 PM IST

दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईत दाखल

दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईत दाखल झाले आहेत. अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल मुंबईत दाखल झाले आहेत.  

Fri, 22 Nov 2019 12:31 PM IST

शिवसेना आमदार जयपूरला जाणार नाहीत

शिवसेना आमदार जयपूरला जाणार नाहीत. ते मुंबईमध्येच एकत्र राहणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली आहे. तसंच लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

Fri, 22 Nov 2019 11:27 AM IST

महाराष्ट्राला मजबूत, कणखर मुख्यमंत्री मिळेल - संजय राऊत

महाराष्ट्राला मजबूत, कणखर मुख्यमंत्री मिळेल. आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी आम्हाला नको. नव्या ऑफर घेण्याची वेळ संपली आहे. संजय राऊत यांनी भाजपला टोला दिला.

Fri, 22 Nov 2019 11:25 AM IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक विराजमान होणार - राऊत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक विराजमान होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल यावर तिन्ही पक्षांची सहमती आहे. 
 

Fri, 22 Nov 2019 11:22 AM IST

संजय राऊत नियमित तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत नियमित तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर एँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 

Fri, 22 Nov 2019 11:16 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज घटक पक्षांसोबत बैठक

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज घटक पक्षांसोबत दुपारी बैठक होणार आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.  

Fri, 22 Nov 2019 11:13 AM IST

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक

राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:'चर्चा अजून संपलेली नाही, शनिवारीही सुरु राहणार'