पुढील बातमी

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ज्याची चर्चा सुरू होती, त्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. दोन्ही राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.  मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या सह अन्य आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचा विधानसभा निवडणुकीचा आणि ६४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या सर्व अपडेट्स

Sat, 21 Sep 2019 12:24 PM IST

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ तारखेला मतमोजणी

Sat, 21 Sep 2019 12:23 PM IST

महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार

Sat, 21 Sep 2019 12:21 PM IST

एकूण ६४ ठिकाणी पोटनिवडणुकाही होणार

Sat, 21 Sep 2019 12:19 PM IST

निवडणुकीत प्लॅस्टिकचा वापर टाळावा - निवडणूक आयोग

Sat, 21 Sep 2019 12:15 PM IST

नक्षलग्रस्त भागासाठी मतदानावेळी खास सुविधा केल्या जाणार

Sat, 21 Sep 2019 12:12 PM IST

महाराष्ट्रासाठी मधू आणि मुरली असे दोन सनदी अधिकारी निवडणूक आयोग राज्यात पाठविणार

Sat, 21 Sep 2019 12:11 PM IST

प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी एकूण २८ लाख रुपयेच खर्च करता येणार

Sat, 21 Sep 2019 12:09 PM IST

पत्रकार परिषदेचे डीडी न्यूज वाहिनीवरील थेट प्रक्षेपण

Sat, 21 Sep 2019 12:07 PM IST

दोन्ही राज्यात जाऊन तेथील निवडणूक तयारीचा आढावा आम्ही घेतला आहे - मुख्य निवडणूक आयुक्त

Sat, 21 Sep 2019 12:02 PM IST

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे

Sat, 21 Sep 2019 12:00 PM IST

निर्वाचन सदनामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात

Sat, 21 Sep 2019 11:36 AM IST

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होण्याची शक्यता

Sat, 21 Sep 2019 11:35 AM IST

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा, तर हरियाणामध्ये ९० जागा

Sat, 21 Sep 2019 11:23 AM IST

महाराष्ट्रात नक्की किती टप्प्यात मतदान होणार याची उत्सुकता

Sat, 21 Sep 2019 11:22 AM IST

दिल्लीत निर्वाचन सदन येथे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान