पुढील बातमी

सत्ता संघर्ष : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

सत्ता संघर्ष : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

राज्यातील राजकीय चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. रविवारी भाजपने राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंबा मिळेल अशी शिवसेनेला आस होती. मात्र राज्यपालांनी दिलेल्या वेळेत शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र सादर करतण्यात अपयश आले. परिणामी शिवसेनेला राजभवनावरुन मोकळ्या हाती माघारी परतावे लागले. राज्यपालांनी आमचा दावा फेटाळला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना अजूनही प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

काँग्रेसच्या निवेदनात शिवसेनेचा उल्लेखही नाही

पण त्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकाच्या पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता झाल्यास शिवसेनेच्या साथीने राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांकडून आलेल्या निमंत्रणाबाबत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरुन माहिती दिली आहे. पाठिंबा देण्याबाबत काही बोलणे झाले का? हे अजून गुलदस्त्यात आहे. 

 

Mon, 11 Nov 2019 11:24 PM IST

सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत बैठकांचे सत्र

राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरुन कळवल्याचे समजते.

Mon, 11 Nov 2019 09:11 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.  

Mon, 11 Nov 2019 09:04 PM IST

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यात दोन ब्लॉक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले आहे. अँजिओग्राफी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर  लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात येत आहे. 

Mon, 11 Nov 2019 08:42 PM IST

राष्ट्रवादीचे नेते राजभवनाकडे

राज्यपालांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना फोन केला आहे. खुद्द अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. 

Mon, 11 Nov 2019 08:24 PM IST

शिवसेनेने राज्यपालांकडे मुदत वाढीची मागणी केली

शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेची तयारी दर्शविली. मात्र त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र वेळेत न आल्यामुळे त्यांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेने राज्यपालांकडे मुतवाढीची मागणी केली मात्र राज्यपालांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला. 

Mon, 11 Nov 2019 08:20 PM IST

एका दिवसात सर्वांशी चर्चा होऊ शकली नाही - माणिकराव ठाकरे

शरद पवारांशी चर्चा करुन पुढील निर्णय होईल. एका दिवसात सर्वांशी चर्चा होऊ शकली नाही, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.  

 

Mon, 11 Nov 2019 08:17 PM IST

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली - राजीव सातव

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची सोनिया गांधीसोबत चर्चा झाली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली आहे. लवकरच निर्णय जाहीर करु, असे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी सांगितले. 

Mon, 11 Nov 2019 07:32 PM IST

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, शिवसेनेने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. 

Mon, 11 Nov 2019 07:29 PM IST

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

आदित्य ठाकरेसह शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यापालांची भेट घेतली. 

Mon, 11 Nov 2019 07:22 PM IST

अपक्ष आमदार बच्चू कडू राजभवनावर दाखल

अपक्ष आमदार बच्चू कडू राजभवनावर दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांच्यासोत राजकुमार पटेल आणि राजेंद्र पाटील देखील राजभवनावर दाखल झाले आहेत. कोण मुख्यमंत्री होईल याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तसंच शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. 

Mon, 11 Nov 2019 07:08 PM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी दिवशी शपथविधी होण्याची शक्यता

पक्षेनेता निवडीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची उद्या बैठक होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची १७ नोव्हेंबरला पुण्यतिथी आहे त्या दिवशी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Mon, 11 Nov 2019 06:58 PM IST

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची बैठक संपली

दिल्लीत सोनिया गांधींच्या घरात सुरु असलेली काँग्रेस नेत्यांची बैठक संपली आहे. ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा ईमेल राज्यपालांना पाठवण्यात आला असल्याची माहिती येत आहे.  

Mon, 11 Nov 2019 06:54 PM IST

आदेश बांदेकर, विनायक राऊत राजभवनावर दाखल

आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच दिवाकर रावते, आदेश बांदेकर, विनायक राऊत, सुभाष देसाई राजभवनावर दाखल झाले आहेत. 

Mon, 11 Nov 2019 06:43 PM IST

आदित्य ठाकरे राजभवनावर दाखल झाले

आदित्य ठाकरे राजभवनावर दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे देखील आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Mon, 11 Nov 2019 06:39 PM IST

शिवसेना आमदारांनी आनंदोत्सव केला साजरा

मढ येथील हॉटेल रिट्रीटवर असलेल्या सर्व आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. एकमेकांना पूरणपोळी भरवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 

Mon, 11 Nov 2019 06:33 PM IST

शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार

चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनाला पाठिंबा दिला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. थोड्याच वेळात सेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Mon, 11 Nov 2019 06:26 PM IST

हा विजय शेतकऱ्यांचा आहे - गुलाबराव पाटील

शिवसेना सत्तेचा दावा करणार असल्याची माहिती शिवसेनाच्या आमदारांनी दिली आहे. महाशिवआघाडी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार असल्याची माहिती शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. हा विजय शेतकऱ्यांचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Mon, 11 Nov 2019 06:23 PM IST

शिवसेनेला समर्थन दिल्याचे फॅक्सद्वारे राष्ट्रवादीने राज्यपालांना पत्र

शिवसेनेला समर्थन दिल्याचे फॅक्सद्वारे राष्ट्रवादीने राज्यपालांना पत्र पाठवले आहे. 

Mon, 11 Nov 2019 05:56 PM IST

राज्यपालांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे रवाना

राज्यपालांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे राजभवनाकडे रवाना झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे देखील आहेत. 

Mon, 11 Nov 2019 05:20 PM IST

सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. 

Mon, 11 Nov 2019 05:10 PM IST

सोनिया गांधी फोनवरुन काँग्रेस आमदारांशी करत आहे चर्चा

जयपूरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांना फोनवरुन सोनिया गांधी चर्चा करत आहेत. शिवसेनाला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Mon, 11 Nov 2019 05:05 PM IST

भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. 

Mon, 11 Nov 2019 04:15 PM IST

सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक सुरु

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे. मलिकार्जुन खर्गे, राजीव सातव, मुकुल वासनिक, माणिराव ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, रजनी पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

Mon, 11 Nov 2019 04:00 PM IST

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते - संजय राऊत

संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते. ते तपासणीसाठी गेले आहेत. डॉक्टरांनी एक ते दोन दिवस त्यांना आराम करायला सांगितले आहे. कदाचित त्यांना उद्या रुग्णालयातून सोडण्यात येईल. काळजी करण्याचे कारण नाही, असे सुनील राऊत यांनी सांगितले.  

Mon, 11 Nov 2019 03:37 PM IST

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राऊत यांची अॅन्जिओग्राफी करण्यात येणार असून डॉ. जलील पारकर संजय राऊत यांच्यावर उपचार करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. 

 

Mon, 11 Nov 2019 03:12 PM IST

राज्यातील प्रमुख सहा नेते सोनिया गांधींशी चर्चा करणार

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विजय वेडेट्टीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे हे दिग्गज नेते काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

Mon, 11 Nov 2019 03:03 PM IST

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादीची फायनल बैठक

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.  

Mon, 11 Nov 2019 02:42 PM IST

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बत पाऊण तास चर्चा

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बत पाऊण तास चर्चा झाली.  या चर्चे दरम्यान अवकाळीने झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

Mon, 11 Nov 2019 02:24 PM IST

दिल्लीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक

दिल्लीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. अहमद पटेल, मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. जवळपास १५ मिनिटं या नेत्यांमध्ये चर्चा झाली. 
 

Mon, 11 Nov 2019 02:07 PM IST

अंतिम निर्णय हायकमांड घेतील - माणिकराव ठाकरे

राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठकीसाठी ४ वाजता दिल्लीमध्ये पोहचतील. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत बैठकीमध्ये चर्चा होईल. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत राज्यातील आमदारांमध्ये संमिश्र मत आहे. मात्र शिवसेनाल पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांड घेतील.', असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. 

Mon, 11 Nov 2019 02:06 PM IST

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक संपली

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुरु असलेली बैठक संपली आहे. वांद्र्यातील ताज हॉटलेमध्ये ही बैठक सुरु होती. बैठक संपल्यानंतर शरद पवार रवाना झाले आहेत. 

Mon, 11 Nov 2019 02:06 PM IST

अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत अरविंद सावंत यांनी जाहीर केले आहे. मंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आला आहे. ६ महिन्यापासून मी मंत्री पदाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विश्वासाहर्तेला तडा गेला. भाजपच्या अध्यक्षांसोबत करार झाला होता. मात्र तो झाला नाही असं बोलून शिवसेनेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

Mon, 11 Nov 2019 01:48 PM IST

वांद्र्यातील हॉटेलमध्ये ठाकरे-पवार बैठक सुरु

वांद्रे पश्चिम येथील ताज लॅण्ड एण्ड हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्येक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुुरु आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. 

Mon, 11 Nov 2019 01:25 PM IST

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरु

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बपैठक सुरु झाली आहे. सत्तास्थापनेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत.  

Mon, 11 Nov 2019 01:10 PM IST

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीसाठी रवाना

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीबाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची ते रवाना झाले आहेत. मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर ते पवारांच्या भेटीसाठी निघाले आहेत. 

Mon, 11 Nov 2019 12:49 PM IST

संजय राऊत मातोश्रीवरुन रवाना

मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक संपली असून संजय राऊत मातोश्रीवरुन रवाना झाले आहेत. 

संजय राऊत (फोटो सौजन्य: प्रतिक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स)
Mon, 11 Nov 2019 12:35 PM IST

काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही निर्णय घेणार - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक संपली आहे. जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा निर्णय आम्ही देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही एकत्र निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Mon, 11 Nov 2019 12:35 PM IST

दिल्लीत काँग्रेसची ४ वाजता होणार बैठक

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेसेचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले आहे. ४ वाजता या नेत्यांची परत बैठक होणार आहे
या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे मत घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे खर्गे यांनी सांगितले.

 

Mon, 11 Nov 2019 11:42 AM IST

भाजपच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव बैठकीसाठी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. 

Mon, 11 Nov 2019 11:04 AM IST

शिवसेना खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल

Mon, 11 Nov 2019 10:35 AM IST

शिवसेना आमदारांच्या राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रावर स्वाक्षऱ्या

रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या शिवसेना आमदारांनी राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.

Mon, 11 Nov 2019 10:30 AM IST

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु

Mon, 11 Nov 2019 09:43 AM IST

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन

Mon, 11 Nov 2019 09:41 AM IST

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

Mon, 11 Nov 2019 09:40 AM IST

महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक

Mon, 11 Nov 2019 09:39 AM IST

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत हायकमांडशी दहा वाजता बैठकः मल्लिकार्जुन खर्गे

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:सत्ता संघर्ष : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन