पुढील बातमी

Maharashtra Election 2019: वेळ संपली, धाकधूक वाढली

Maharashtra Election 2019: वेळ संपली, धाकधूक वाढली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ जागांसाठीची सायंकाळची सहा वाजताची वेळ संपली आहे. जे मतदार रांगेत उभे आहेत, त्यांना मतदानाची संधी देण्यात आली. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेपर्यंत जवळपास ६०.४३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबई-ठाणे या महानगरांपेक्षा पुण्यात अधिक मतदान झाले असले तरी मागील विधानसभेच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. कोल्हापूरात ५५ टक्केचा आकडा पार झाला आहे.  नागपूर ४८, बुलडाणा ५२, वाशिम ५२, अमरावती-वर्धा प्रत्येकी ४५ भंडारा जिल्ह्यात ५६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहे. 

महाराष्ट्र

संस्था भाजप-शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी  अन्य
एबीपी-सी व्होटर+ 204 69 15
टाइम्स नाऊ+ 230 48 10
इंडिया टुडे+ 166-194 72-90 22-34

हरियाणा

संस्था भाजप कांग्रेस अन्य
सीएनएन-न्यूज १८ 75 10 5
टाइम्स नाऊ 71 11 8
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट 75-80 9-12 1-4

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रकिया पार पडली. राज्यात २८८ जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा त्याचसोबत पोलिस प्रशासन देखील सज्ज होते. महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार होते. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्यात ३ लाख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ७ वाजता मतदानाला झाली होती. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे भाग्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.  

Mon, 21 Oct 2019 05:39 PM IST

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यात केले मतदान

Mon, 21 Oct 2019 05:23 PM IST

ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकून विरोध

शाई फेकणारा व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा

Mon, 21 Oct 2019 05:22 PM IST

पाच वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान

सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यभरात ४५ टक्के मतदान झाले

Mon, 21 Oct 2019 04:56 PM IST

सलमान खानने देखील बजावला मतदानाचा हक्क

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सलमान खानने मतदानाचा हक्क बजावला.
Mon, 21 Oct 2019 04:21 PM IST

राज्यभरात काँग्रेसकडून ईव्हीएमच्या २२१ तक्रारी दाखल

राज्यभरात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत काँग्रेसकडून ईव्हीएमसंदर्भात २२१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Mon, 21 Oct 2019 04:09 PM IST

मोहोळ विधानसभा मतदार संघात ४५.५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत मोहोळ विधानसभा मतदार संघात ४५.५ टक्के मतदान झाले असून शहराबरोबरच तालुक्यात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.

Mon, 21 Oct 2019 04:01 PM IST

राज्यात ३ वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान

राज्यभरात विधानसभेसाठी मतदान होत असून दुपारी  ३ वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान झाले आहे. शहरी मतदार संघाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा टक्का अधिक आहे.

Mon, 21 Oct 2019 03:44 PM IST

बच्चन कुटुंबियांनी केले मतदान

अभिनेता अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मतदानाचा हक्क बजावला. जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 03:42 PM IST

अभिनेता सनी देओलने केले मतदान

अभिनेता सनी देओलने जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 03:40 PM IST

शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत मतदानाचा हक्क बजावला

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर जाऊन त्याने मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 02:35 PM IST

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८९ टक्के मतदान

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८९ टक्के मतदान झाले आहे.  

Mon, 21 Oct 2019 02:34 PM IST

अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केले मतदान

अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

Mon, 21 Oct 2019 02:33 PM IST

दिपीका पादुकोनने मतदानाचा हक्क बजावला

अभिनेत्री दिपीका पादुकोनने मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पश्चिम येथे तिने मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 02:16 PM IST

मतदान केंद्रावर भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू

गडचिरोलीत मतदान केंद्रावर भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडू गावडे यांचा मृत्यू झाला आहे. 

Mon, 21 Oct 2019 02:12 PM IST

हृतिक रोशन आणि अनिल कपूरने केले मतदान

अभिनेता हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अंधेरी पश्चिम येथे त्यांनी मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 02:00 PM IST

सोलापूरमध्ये आतापर्यंत २३.९९ टक्के मतदान झाले

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत २३.९९ टक्के मतदान झाले.

Mon, 21 Oct 2019 01:37 PM IST

अभिनेता गोविंदाने पत्नीसोबत मतदान केले

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला. अंधेरी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्याने मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 01:35 PM IST

स्मृती इराणी यांनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 

Mon, 21 Oct 2019 01:32 PM IST

हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्का बजावला

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्का बजावला. अंधेरी पश्चिम येथे त्यांनी मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 12:29 PM IST

सचिन तेंडुलकरने सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सचिनसह पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांनी वाद्रे पश्चिम येथे मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 12:27 PM IST

अभिनेते प्रेम चोप्रा आणि गीतकार गुलजार यांनी केले मतदान

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि गीतकार गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 12:12 PM IST

माधुरी दिक्षीतने वांद्रे पश्चिम येथे मतदान केले

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित हिने मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला.  

Mon, 21 Oct 2019 12:11 PM IST

लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांना मतदानाचा हक्क बजावला

लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांना मतदानाचा हक्क बजावला.  बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया हिने देखील मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 12:09 PM IST

एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले मतदान

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ठाण्यातल्या किसन नगर-३ येथील मनपा शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 11:02 AM IST

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले मतदान

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. 

अशोक चव्हाण
Mon, 21 Oct 2019 10:56 AM IST

राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. दादर येथील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रात राज ठाकरेंनी मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 10:55 AM IST

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला.  धरमपेठ येथील मनपा शाळेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मतदान केले

Mon, 21 Oct 2019 10:54 AM IST

पुणे जिल्ह्यात दोन तासांत ५.६५ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासांत ५.६५ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

Mon, 21 Oct 2019 10:50 AM IST

आरे कॉलनीतील बूथ क्रमांक ४१ वर ईव्हीएम मशीन बंद

आरे कॉलनीवरील बूथ क्रमांक ४१ वर गेल्या १० ते १५ मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. आपचे उमेदवार विठ्ठल लाड यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली. या मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मतदान करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. 

Mon, 21 Oct 2019 10:38 AM IST

शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई येथे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत त्यांनी मतदान केले. 

शरद पवारांनी केले मतदान
Mon, 21 Oct 2019 10:35 AM IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले मतदान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. 

बाळासाहेब थोरातांनी केले मतदान
Mon, 21 Oct 2019 10:28 AM IST

पुण्यात मतदान केंद्रावरील विज पुरवठा खंडीत

शिवाजीनगर येथे मतदान केंद्रावरील विज पुरवठा खंडीत झाला आहे. तरी देखील मतदान सुरु आहे. 

Mon, 21 Oct 2019 10:21 AM IST

अभिनेत्री लारा दत्ताने केले मतदान

माजी टेनिसपटू महेश भूपती आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता यांनी वांद्र पश्चिम येथील मदतान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.  

Mon, 21 Oct 2019 10:20 AM IST

अमीर खानने मतदानाचा अधिकार बजावला

 बॉलिवूड सुपरस्टार अमीर खानने वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा अधिकार बजावला. तसंच महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे अशी विनिंत अमीरने केली आहे. 

Mon, 21 Oct 2019 10:06 AM IST

मतदानासाठी मुंबईतील मतदान केंद्रावर गर्दी

मुंबईतील शिवडी येथील मतदान केंद्रावर जाऊन दिव्यांगांनी बजावला मतदानाचा अधिकार. 

Mon, 21 Oct 2019 10:01 AM IST

दिव्यांग पती-पत्नीने बजावला मतदानाचा हक्क

मुंबईमध्ये दिव्यांग पती-पत्नीने मतदानाचा हक्क बजावला. जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. 

Mon, 21 Oct 2019 09:53 AM IST

सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे केले मतदान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. आमदार प्रणिती शिंदेंनी देखील यावेळी मतदान केले. सोलापूरातील जागृती विद्या मंदिर येथे त्यांनी मतदान केले.

Mon, 21 Oct 2019 09:52 AM IST

मुंबईमधील १० मतदार संघामध्ये ५ टक्के मतदान

मुंबईमधील १० मतदार संघामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ५ टक्के मतदान झाले.  

Mon, 21 Oct 2019 09:42 AM IST

लातूरमध्ये पावसामुळे मतदान केंद्राबाहेर कमी गर्दी

लातूरमध्ये सकाळपासून पाऊस सुरु आहे. पावसामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांची कमी गर्दी पहायला मिळत आहे. 

Mon, 21 Oct 2019 09:36 AM IST

मुक्ता टिळक यांनी सहकुटुंब केले मतदान

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मुक्ता टिळक या भाजपकडून कसबा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतल्या आहेत. मुक्ता टिळक यांनी केले मतदान

Mon, 21 Oct 2019 09:09 AM IST

प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले.  

Mon, 21 Oct 2019 08:53 AM IST

गणेश नाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

भाजपचे उमदेवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन त्यांनी मतदान केले. 

गणेश नाईक यांनी केले मतदान
Mon, 21 Oct 2019 08:45 AM IST

उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब केले मतदान

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.उदयनराजे भोसले यांनी केले मतदान

 

Mon, 21 Oct 2019 08:35 AM IST

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप-सेना युती २२५ जागांवर जिंकतील असा विश्वास पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. तसंच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे.

Mon, 21 Oct 2019 08:31 AM IST

सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे मतदान केले. काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

Mon, 21 Oct 2019 08:17 AM IST

नागपूरमध्ये नितीन गडकरींनी केले मतदान

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. 

Mon, 21 Oct 2019 08:13 AM IST

आदित्य ठाकरेंनी घेतले सिध्दिविनायकाचे दर्शन

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदान करण्यापूर्वी त्यांनी सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. 

Mon, 21 Oct 2019 07:59 AM IST

रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे सुपुत्र संतोष दानवे भोकरदन विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत. भोकरदन जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

Mon, 21 Oct 2019 07:57 AM IST

अभिनेत्री सुलभा खोटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानासाठी मुंबईकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेत्री सुलभा खोटे यांनी अंधेरी पश्चिम येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.   

Mon, 21 Oct 2019 07:46 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सहकुटुंब बारामती येथील काटेवाडी मतदान केंद्रावर मतदान केले.

Mon, 21 Oct 2019 07:43 AM IST

माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्का

माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे चिरंजीव देखील त्यांच्यासोबत होते. 

Mon, 21 Oct 2019 07:35 AM IST

माजी मुंबई पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी मतदान केले

माजी मुंबई पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केले.

Mon, 21 Oct 2019 07:32 AM IST

पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे मतदान केंद्राबाहेर चिखल साचला आहे. 

Mon, 21 Oct 2019 07:16 AM IST

नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी केले मतदान

नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले. भाऊसाहेब दफ्तरी मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Mon, 21 Oct 2019 07:13 AM IST

मतदानाचा हक्क बजावा - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन लोकशाहीचा सण समृध्द करा असे त्यांनी म्हटले आहे. तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

Mon, 21 Oct 2019 07:10 AM IST

मुंबईमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात

मुंबईमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मलबार हिल मतदार संघात मतदारांनी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावला.  

Mon, 21 Oct 2019 07:00 AM IST

मलबार हिल येथील मतदान केंद्रावर तयारी सुरु

मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रावर तयारी सुरू आहे. या मतदारसंघातून भाजपकडून मंगल प्रभात लोढा आणि काँग्रेसच्या हिरा देवासी हे निवडणूक लढवत आहेत. 

Mon, 21 Oct 2019 06:58 AM IST

३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार

३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच मतदान केंद्रावर तयारी सुरु आहे.

Mon, 21 Oct 2019 06:54 AM IST

गोंदिया मतदान केंद्रावर तयारी सुरु

गोंदिया विधानसभा मतदार संघासाठी बूथ क्रमांक २८५ वर मॉक पोलिंग सुरू आहे. या मतदारसंघातून भाजपचे गोपाळ अग्रवाल आणि काँग्रेसचे अमर वराडे निवडणूक लढवत आहेत.

Mon, 21 Oct 2019 06:53 AM IST

वांद्रे येथील मतदान केंद्रावर तयारी सुरु

मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र २३३-२८४ वर तयारी सुरु आहे. या मतदारसंघातून भाजपकडून आशिष शेलार आणि काँग्रेसचे आसिफ झकारिया यांच्यात लढत होणार आहे.  

Mon, 21 Oct 2019 06:46 AM IST

नागपूरमध्ये मतदानासाठी तयारी पूर्ण

नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी मतदान केंद्र - १४४ येथे मॉक पोलिंग सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Election 2019: वेळ संपली, धाकधूक वाढली