पुढील बातमी

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड

राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गट नेतेपदी अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. अजित पवार विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे नेते म्हणून काम पाहतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करत विरोधी बाकावर काम करण्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दर्शवलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात विधीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळाच्या नेतेपदाची निवड करण्यात आली.जयंत पाटील यांनी पक्षाची भुमिका मांडताना भाजपवर निशाणा साधला. राज्यातील निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपने ३७० कलमाचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक मुद्द्याला बगल दिल्याचे ते म्हणाले.

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी

खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिठकरी यांचा राष्ट्रवादीच्या यशात मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.  सर्वात कमी जागा लढवून देखील शरद पवारांमुळे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. पक्षाला नवी ऊर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Wed, 30 Oct 2019 06:03 PM IST

विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची वर्णी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्तावाला मंजूरी

Wed, 30 Oct 2019 05:47 PM IST

सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी पवार साहेबांनी हुकमी एक्का बाहेर काढला : जयंत पाटील

साताऱ्यातील निकाल हा लोकांना पक्षांतर आवडत नसल्याची अनुभूती देणारा असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. साताऱ्यातील लोकसेभेच्या जागेवर उदयनराजे भोसले  आणि श्रीनिवास पाटील यांच्यात लढत झाली होती.   

Wed, 30 Oct 2019 05:43 PM IST

भाजपने कलम ३७० च्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याला सुरुवात केली : जयंत पाटील

भाजपने स्थानिक मुद्दे लक्षात न घेता जम्मू काश्मीरमधील कलम ३७० च्या मुद्दयावरुन प्रचाराला सुरुवात केली, असे सांगत जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड